शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आहेरगावच्या जवानाचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 00:53 IST

निफाड तालुक्यातील आहेरगाव येथील सुदर्शन दत्तात्रय देशमुख (वय 32) या जवानाचा पंजाबच्या पठाणकोट येथे कर्तव्यावर असताना मृत्यू झाला. या घटनेमुळे निफाड तालुक्यात शोककळा पसरली आहे. सुदर्शन यांचे पार्थिव बुधवारी (दि. 11) आहेरगावी येण्याची शक्यता आहे.

पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यातील आहेरगाव येथील सुदर्शन दत्तात्रय देशमुख (वय 32) या जवानाचा पंजाबच्या पठाणकोट येथे कर्तव्यावर असताना मृत्यू झाला. या घटनेमुळे निफाड तालुक्यात शोककळा पसरली आहे. सुदर्शन यांचे पार्थिव बुधवारी (दि. 11) आहेरगावी येण्याची शक्यता आहे.आहेरगाव येथील सुदर्शन दत्तात्रय देशमुख यांची पठाणकोट येथे नियुक्ती होती. सोमवारी (दि. 9) मध्यरात्रीच्या सुमारास सुदर्शन यांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना मिळाली. सुदर्शन यांचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे. पिहली ते सातवीचे शिक्षण आहेरगाव येथील प्राथमिक विद्यामंदिर येथे, आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण पिंपळगाव हायस्कूल, तर अकरावी ते बारावीचे शिक्षण पिंपळगावच्या क. का. वाघ महाविद्यालयात झाले आहे. 2009-10 साली सैन्यदलात भरती झाले. पुणे येथे प्रशिक्षण झाल्यानंतर सन 2012 साली लेह-लडाख येथे त्यांची पिहल्यांदा नियुक्ती झाली. 2018पासून पठाणकोट येथे सुदर्शन कर्तव्यावर होते. त्यांच्या कुटुंबात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.लहानपणापासूनच सैन्यदलात जाण्याचे सुदर्शन यांचे स्वप्न होते. उरी बाळगलेल्या ध्येयाची स्वप्नपूर्ती झाली. त्यांचा गावालाही अभिमान होता. चुलत भाऊ योगेश दीपक देशमुख यानेही सुदर्शनचा आदर्श समोर ठेवून सैन्यदलात जाण्याचे स्वप्न बाळगले. 2014-15 साली भरती झालेले योगेश आता कुपवाडा येथे कर्तव्य बजावत आहे.तो फोन ठरला अखेरचासुदर्शन यांनी सोमवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास आहेरगावी येथे फोन करीत कुटुंबाची विचारपूस केली. चांदवड येथे घर घेण्यासाठी जागा घेण्याची इच्छा सुदर्शन याने व्यक्त केली. जागा बघण्यासाठी वडील दत्तात्रय मंगळवारी चांदवड येथे जाणार होते. मोठ्या भावासाठी दुकान टाकणार असल्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. मात्र, दुर्दैवाने चार तासांनंतरच मध्यरात्री सुदर्शन यांच्या मृत्यूची बातमी येताच कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.

टॅग्स :NashikनाशिकSoldierसैनिक