शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
2
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
3
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
4
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
5
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
6
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
7
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
8
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
9
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
10
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
11
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
12
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
13
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
14
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
15
सुंदर वहिनीला नणंदेने पळवून नेले, घरदार सोडून दोघे झाले गायब, असं फुटलं बिंग   
16
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर
17
Laxman Hake: दहा-बारा पोलीस असताना लक्ष्मण हाकेंची गाडी फोडली; बांबूने हल्ला, काय घडलं?
18
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
19
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
20
'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात

कृषी सहायकांचा संप सुरू; कामकाज ठप्प

By admin | Updated: July 14, 2017 00:10 IST

चांदवड : कृषी विभागातील कृषी सहायक बेमुदत संपात सहभागी झाले आहेत. चांदवड तालुक्यातील सर्व कृषी सहायकही संपात सहभागी झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कचांदवड : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातील कृषी सहायक आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी दि. १० जुलैपासून बेमुदत संपात सहभागी झाले आहेत. चांदवड तालुक्यातील सर्व कृषी सहायकही संपात सहभागी झाले आहेत. शासनाच्या शेतकरी हिताच्या विविध योजना गावपातळीवर प्रत्यक्ष शेतकऱ्यांचे शेतावर समक्ष हजर राहून त्यांना मार्गदर्शन करणे, योजनेत सहभागाकरीता उत्स्फुर्त करणे व सहभागी करुन योजनेतंर्गत अनुदानाचा प्रत्यक्ष लाभ मिळवुन देणे. याकामी कृषी सहाय्यकांची भूमिका कायमच महत्वाची ठरलेली आहे. मात्र असे असतांना कृषी सहाय्यकाच्या दीर्घ काळापासून प्रलंबीत विविध मागण्यासाठी शासनस्तरावर कायम प्रयत्न केले. प्रंसगी आंदोलने , उपोषणे संप करुनही शासनाने या प्रलंबीत मागण्याकडे कायमच दुर्लक्ष केले आहे. करीता दि. १२ जुन १७ पासून विविध टप्पेनिहाय आंदोलनास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून दि. १० जुलै १७पासून बेमुदत संपाचे हत्यार उपसले असून त्यात चांदवडचे शंभर टक्के कृषी सहाय्यक सहभागी झाले आहेत. कृषी सेवक पदाचा कंत्राटी कालावधीतील तीन वर्षाचा कालावधी कायम सेवेसाठी धरणेत येऊन त्याचा प्रत्यक्ष लाभ देण्यात यावा, कृषी विभागाचा सुधारीत आकृतीबंध जाहीर करुन तो लागु करावा, तरच नियोजीत जलसंधारण विभागाकडे कर्मचारी वर्ग करावेत. कृषी पर्यवेक्षकांची पदोन्नती कृषी सहायक संवर्गातूनच शंभर टक्के करावी व आंतरविभागीय बदल्या तातडीने कराव्यात. वरील सर्व मागण्यांकामी टप्पेनिहाय आंदोलनातून मागण्या करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कृती आराखड्यानुसार मंजुर कार्यक्रम फळबाग लागवड आराखड्यानुसार मंजुर कार्यक्रम फळबाग लागवड नाडेप कॅपोस्ट , गांडुळ खत उत्पादन युनिट शेततळे, विहीर पुर्नभरण, बांधावर वृक्ष लागवड असे बाबनिहाय कार्यक्रम राबविणे शक्य होणार नाही. या मागण्यांचे निवेदन तालुका कृषी अधिकारी विजय पवार यांना देण्यात आले. कृषी सहायकाच्या मागण्या बाबत यश पदरी पडत नसल्याने दि. १० जुलै १७ पासून सर्वच कृषी सहायक बेमुदत संपात सहभागी झाले आहेत. संपामुळे उन्नत शेती समृध्द शेतकरी अभियानांतर्गत शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट वाढविणेकरिता आवश्यक तंत्रज्ञान शेतकऱ्यांना मिळणार नाही. मागेल त्याला शेततळे योजनेतंर्गत करावयाची कार्यवाही थांबणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले.