लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कृषी दिनाचे औचित्य साधत शेतकऱ्यांच्या शेतीविषयक अडीअडचणी सोडविण्यासाठी क. का. वाघ कृषी महाविद्यालयाच्या कृषिदूतांनी सिन्नर तालुक्यातील विंचुरी दळवी येथे कृषी माहिती केंद्र उभारले आहे. या केंद्राचे उद्घाटन विंचुरी दळवीच्या सरपंच संगीता पवार यांच्या हस्ते झाले.सदर केंद्रामार्फत कृषिदूत हे शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधत, तसेच व्हॉट्सग्रुपच्या माध्यमातून अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करणार आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळेत सदर माहिती केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. या ठिकाणी शेतीविषयक माहितीपर पत्रके लावण्यात आली आहेत. केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी सरपंच संगीता पवार यांच्यासह ग्रामविकास अधिकारी संजय गिरी, मुख्याध्यापक प्रकाश तळपे, बाळासाहेब पांडे, केंद्रप्रमुख श्रीमती पवार, कृषिदूत संकेत महाजन, सुनील चौधरी, श्रीनिवास नवले, सागर पाटील, यश पाटील, भूषण पाटील, आशुतोष पाटील, अकलेश मोरे, सोमनाथ ठाकरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, कृषिदिनानिमित्त गावात वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामस्थांनी वृक्षप्रतिज्ञा घेतली. वृक्षदिंडीत कृषिदूत यांच्यासह जिल्हा परिषदेच्या शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. याप्रसंगी लक्ष्मण भोर, प्रकाश तळपे, शांताराम वाघचौरे, भाऊसाहेब पवार आदी उपस्थित होते.
वाघ महाविद्यालयातर्फे कृषी माहिती केंद्राचे उद्घाटन
By admin | Updated: July 2, 2017 00:05 IST