शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

सिन्नरला काँग्रेसच्यावतीने बाजार समितीच्या गेटवर धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2020 3:08 PM

सिन्नर : सिन्नर तालुका काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सिन्नर बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन केले. केंद्र शासनाने मंजूर केलेल्या शेतकरी विधेयकाविरोधात त्याचप्रमाणे कामगार विरोधी कायद्याच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देनिषेध: केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी विधायकबद्दल संताप

सिन्नर : सिन्नर तालुका काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सिन्नर बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन केले. केंद्र शासनाने मंजूर केलेल्या शेतकरी विधेयकाविरोधात त्याचप्रमाणे कामगार विरोधी कायद्याच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष विनायक सांगळे यांनी मनोगत व्यक्त केले. शेतकरी कामगार कायदा हा संपूर्णपणे शेतकऱ्याच्या विरोधात असून हा कायदा केंद्र सरकारने रद्द करावा त्याचप्रमाणे केंद्र सरकारने कामगारांचे विरोधातले धोरण आखले आहे, त्यामुळे संपूर्ण कामगारवर्ग हा देशोधडीला लागला असल्याची टीका केली. शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये कायदा लागू केला या कायद्यान्वये संपूर्ण शेतकरी वर्ग हा उद्ध्वस्त झाल्याचे राहणार नाही, संपूर्णपणे मार्केट कमिटी उद्ध्वस्त करण्याचा घाट या केंद्रातील सरकारने मोदी सरकारने चालवला आहे तो अतिशय अन्यायकारक असून या कायद्यान्वये शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचे त्याच्या शेती मला बद्दल त्याचप्रमाणे शेतीमाल विकल्यानंतर व्यापाऱ्याकडून मिळणाऱ्या मोबदल्याची हमी याबद्दल कुठल्याही प्रकारचं संरक्षण कायदा अशा असंख्य प्रकारच्या त्रुटी या कायद्यात करून हा कायदा फक्त ठराविक उद्योग-व्यवसाय काम करता करून त्यांना फक्त मोठे करणे हा या कायद्याचा हेतू असल्याचे ते म्हणाले. या कायद्यान्वये कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग साठेबाजी या अशा सर्व गोष्टींना खूप मोठ्या प्रमाणात वाव मिळून शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा चांगला मोबदला न देता शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट करून ठराविक व्यापाऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न मिळेल याची काळजी या कायद्यात घेण्यात आली त्याच प्रमाणे कायद्याच्या कामगारांच्या बाबतीत धोरण अतिशय चुकीचे असून 300 कामगारांपर्यंत असलेल्या कंपनी धारकांना कुठल्याही प्रकारची नोटीस न देता कामगारांना कमी करण्याचा अधिकार राहील त्यामुळे कारखानदारांची अरेरावी खूप मोठ्या प्रमाणात वाढल्याशिवाय राहणार नसल्याचे सांगळे म्हणाले. परिणामी खूप मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढण्याची संभावना या कायद्याने असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. यावेळी सिन्नर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी सिन्नर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विनायक सांगळे, नाशिक जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष दिनेश चोथवे, सिन्नर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मुजाहिद खतीब, सिन्नर तालुका समन्वयक उदय जाधव, सिन्नर तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्षा मीना देशमुख, शिवराम शिंदे, बाळासाहेब गोरडे, बाळासाहेब शिंदे, वामनराव उकाडे, जाकीर शेख, ज्ञानेश्वर लोखंडे, ज्ञानेश्वर पवार, अंबादास भालेराव उपस्थित होते.राहुल गांधी यांच्यावर झालेल्या लाठीचार्ज व योगी सरकारचा निषेध1 ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेशामध्ये राहुल गांधी हे त्या ठिकाणी झालेल्या बलात्कार आणि हत्या झालेल्या मुलीच्या घरच्यांना भेटण्यासाठी जात असताना त्याठिकाणी योगी सरकारच्या पोलिस यंत्रणेने त्यांच्यावरती लाठीचार्ज करण्यात आला अशा या घाणेरड्या वृत्तीच्या योगी सरकारचा याठिकाणी निषेध करण्यात आला त्याचप्रमाणे जर अशा घटनेला आणि अशा पापी कृत्यांना जर भारतीय जनता पार्टी जर पाठबळ देत असेल तर हा लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम या सरकारकडून केले जात आहे चांगले काम करण्याची मुस्कटदाबी करणारे वृत्तीचे हे सरकार याचा निषेध याठिकाणी करण्यात आला. जर परत अशा प्रकारची घटना करण्याचा प्रयत्न जर बीजेपी आणि आरएसएस च्या लोकांनी जर केला तर याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील आपला महाराष्ट्र राज्य शांतता पहिले राज्य असून आपणास या रहा राहणार या राज्यांमध्ये कायदा सुव्यवस्था हातात घेऊन कुठल्याही प्रकारचे वेडेवाकडे आंदोलन न करता शांततेच्या मार्गाने राहुल गांधींवर केलेल्या लाठीचार्ज व काँग्रेसजनांना वरती केलेल्या अत्याचाराचा निषेध याठिकाणी करण्यात आला.फोटो ओळी-

सिन्नर तालुका काँग्रेसच्यावतीने केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी विधायकाचा निषेध करण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले. त्याप्रसंगी सिन्नर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विनायक सांगळे, नाशिक जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष दिनेश चोथवे, शहराध्यक्ष मुजाहिद खतीब, उदय जाधव, मीना देशमुख, शिवराम शिंदे, बाळासाहेब गोरडे, बाळासाहेब शिंदे, वामनराव उकाडे आदि. 

 

टॅग्स :sinnar-acसिन्नरStrikeसंप