शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकीदारांवर लवकरच मालमत्ता जप्तीची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 00:06 IST

महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकी वसुलीची मोहीम सुरू असून, थकबाकी न भरणाऱ्यांवर लवकरच मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचे मनपा सूत्रांकडून सांगण्यात आले.

सिडको : महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकी वसुलीची मोहीम सुरू असून, थकबाकी न भरणाऱ्यांवर लवकरच मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचे मनपा सूत्रांकडून सांगण्यात आले.  महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने घरपट्टी व पाणीपट्टीची वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे. या कार्यालयाच्या अखत्यारित ९७ हजार ८७९ मिळकतधारक असून, या सर्वांना मनपाच्या वतीने घरपट्टी तसेच पाणीपट्टीची बिले देण्यात आली आहे. यंदाच्या वर्षी मनपास वरिष्ठांनी घरपट्टीचे ४६ कोटी ३५ लाख ७१ हजार तर पाणीपट्टीचे २० कोटी ७९ लाख इतके उद्दिष्ट देण्यात आले आहे. घरपट्टी व पाणीपट्टीचे मिळून ६७ कोटी १४ लाख ७१ हजार इतके उद्दिष्ट देण्यात आले आहे. उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मनपाच्या वतीने विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली धडक वसुली मोहीम सुरू केली आहे. घरपट्टी व पाणीपट्टीची थकबाकी भरण्यासाठी मिळकतधारकांना नोटिसा बजाविण्यात आल्या होत्या. यानंतरही थकबाकी न भरणाऱ्या सुमारे ६६ मिळकतधारकांना मालमत्ता जप्तीची कारवाई करण्याचे जप्ती वॉरंटदेखील बजाविण्यात आले असल्याचे मनपाच्या वतीने सांगण्यात आले. घरपट्टीचे ४६ कोटी ३५ लाख ७१ हजार उद्दिष्टांपैकी बुधवारपर्यंत (दि.१३) सुमारे २० कोटी ४७ लाख इतकी वसुली झाली असून, अजूनही २५ कोटी ८८ लाख इतकी थकबाकी आहे. तर पाणीपट्टीच्या २० कोटी ७९ लाख उद्दिष्टापैकी ७ कोटी ८० लाख इतकी वसुली झाली आहे. अजूनही पाणीपट्टीची १३ कोटी रुपयांची थकबाकी आहे. एकूणच घरपट्टी व पाणीपट्टी मिळून २८ कोटी २७ लाख इतकी वसुली झाली आहे. मार्च अखेरपर्यंत अजूनही घरपट्टी व पाणीपट्टीची मिळून सुमारे ३८ कोटी ८८ लाख इतकी थकबाकी आहे. थकबाकी वसुलीसाठी मनपाच्या वतीने धडक वसुली मोहीम सुरू केली आहे. तसेच सूचनापत्र देऊनही थकबाकी न भरणाऱ्यांना मनपाच्या वतीने जप्तीच्या वॉरंट नोटीस बजाविण्यात आल्या असून, यानंतर मुदत देऊनही थकबाकी न भरणाºयांवर मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे.महापालिकेच्या वतीने घरपट्टी व पाणीपट्टी वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे. वरिष्ठांनी मार्च अखेरपर्यंत दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी धडक वसुली मोहीम सुरू असून, थकबाकी न भरणाºया मिळकतधारकांना जप्तीचे वॉरंट बजाविण्यात आले आहे. जप्तीची कारवाई टाळण्यासाठी थकबाकी भरण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.  - डॉ. सुनीता कुमावत  विभागीय अधिकारी, मनपा सिडको विभाग

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाTaxकर