शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
2
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
3
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
4
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
5
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
6
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
7
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
8
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
9
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
10
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
11
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
12
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
13
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
14
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
15
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
16
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
17
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
18
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
19
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
20
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन

वय शंभरी पार, मतदानाचा उत्साह अपार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 01:51 IST

Maharashtra Assembly Election 2019 एकीकडे सर्वसामान्यांसह सुशिक्षित मतदारांमध्ये मतदानाबद्दल अनास्था वाटत असताना दुसरीकडे वयाची शंभरी पार केलेल्या सिन्नर तालुक्यातील दापूर व येवला तालुक्यातील गवंडगाव येथील आजीबार्इंनी मतदानाचा हक्क बजावून समाजासमोर आदर्श उभा केला आहे.

नाशिक : एकीकडे सर्वसामान्यांसह सुशिक्षित मतदारांमध्ये मतदानाबद्दल अनास्था वाटत असताना दुसरीकडे वयाची शंभरी पार केलेल्या सिन्नर तालुक्यातील दापूर व येवला तालुक्यातील गवंडगाव येथील आजीबार्इंनी मतदानाचा हक्क बजावून समाजासमोर आदर्श उभा केला आहे.दापूर येथील म्हाळूंशेठ केदार यांच्या मातोश्री व माजी सरपंच गोविंदशेठ केदार यांच्या आजी अनुसयाबाई त्र्यंबक केदार यांनी वयाच्या १०४ व्या वर्षी मतदानाचा हक्क बजावला. केदार कुटुंबातील प्रकाश केदार, राजू केदार, विजय केदार, सुरेश केदार, दिपक केदार यांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला. तसेच मतदार जागृतीसाठी विशेष प्रयत्नही केले.येवला येथील गुजराथी कुटुंबातील १०३ वर्षांच्या चमेलीबाई गुजराथी या आजीसह त्यांच्या कुटुंबातील मुलगा, नातू, पणतू, सुना यांनी येथील एकाच मतदान केंद्रात जाऊन मतदान केले. महत्त्वाची बाब म्हणजे आजी आजारी असतानादेखील मतदानासाठी आल्या होत्या. गुजराथी कुटुंबातील चमेलीबाई गुजराथी यांनी मुलगा अरु णचंद्र गुजराथी, नातू मयूर गुजराथी व पणतू महर्षी गुजराथी यांच्यासह सुना, नातवंडे यांनी एकत्रितरित्या मतदानाचा अधिकार बजावला.या आजींनी आपल्या चार पिढ्यांना मोठे होताना पाहिले. स्वातंत्र्यांनतर त्यांनी कधीही मतदान चुकवले नाही. घरच्यांसोबत लोकशाहीचा उत्सव नेहमी साजरा केला. आज आजी आजारी असतानादेखील त्यांनी कुटुंबासह येऊन मतदानाचा हक्क बजावला.भगूर येथील ति.झं. विद्यामंदिर शाळेतील मतदान केंद्रावर पार्वतीबाई मोजाड या १०२ वर्षे वयाच्या आजींनी आप्तेष्टांसमवेत येऊन उत्साही वातावरणात मतदान केले.असेच एक उर्जादायी उदाहरण येवला तालुक्यातील म्हणता येईल. गवंडगाव येथील भगीरथीबाई सीताराम संत यांनी १०१ व्या वर्षी आपल्या नातलगांचा आधार घेत मतदान करुन तरुणांसह इतर मतदारांना प्रोत्साहीत केले आहे.गौळाणेतील आजीबार्इंनी जपली अखंडित मतदानाची परंपरा!१९६२ साली झालेल्या पहिल्या निवडणुकीपासूनते आतापर्यंत १४व्या विधानसभा निवडणुकीपर्यंत नॉनस्टॉप मतदानाचा हक्क गौळाणे (ता. नाशिक) येथील शंभर वर्षे वयोमान असलेल्या सखूबाई नामदेव चुंभळे या आजीबार्इंनी बजावला.सखूबार्इंनी देवळाली मतदारसंघात आपला नातू विश्वास चुंभळे यांच्यासोबत मतदान केंद्र गाठत मतदान केले. आपण पहिल्या निवडणुकीपासून मतदान करत आलो असून, मतदान करणे ही आनंदाची गोष्ट असते. त्यामुळे तो आनंद प्रत्येक मतदाराने घेतला पाहिजे, अशी भावना सखूबार्इंनी व्यक्त केली.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019VotingमतदानNashikनाशिक