शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी बंदीच्या विरोधात न्यायालयात धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 01:00 IST

नाशिक महापालिकेने शहरातील २०९ अंगणवाडी कायमस्वरूपी बंद करण्याच्या निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात भारतीय हितरक्षक सभेच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका एकवटल्या असून, महापालिकेच्या निर्णयाविरोधात न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय अंगणवाडी सेविकांनी घेतला आहे.

पंचवटी : नाशिक महापालिकेने शहरातील २०९ अंगणवाडी कायमस्वरूपी बंद करण्याच्या निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात भारतीय हितरक्षक सभेच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका एकवटल्या असून, महापालिकेच्या निर्णयाविरोधात न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय अंगणवाडी सेविकांनी घेतला आहे.  भारतीय हितरक्षक सभा या सामाजिक संघटनेच्या नेतृत्वात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची किरण मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि. १२) पंडित पलुस्कर सभागृहात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी अंगणवाडी बंद करण्याच्या निर्णयाविरोधात सेविका व मदतनीस यांनी संताप व्यक्त करताना महापालिका अन्यायकारक पद्धतीने अंगणवाडी शाळा बंद करीत असल्याचा आरोप केला. तसेच २०१८-२०१९ या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी त्वरित सुरू करावे, मनपाच्या अन्यायाला लोकशाही पद्धतीने आंदोलन करून उत्तर देण्याचा निर्धार अंगणवाडी सेविकांनी केला असून, अंगणवाडी कर्मचाºयांची २१ सदस्यीय सेंट्रल अ‍ॅक्शन कमिटीही स्थापन करण्यात आली आहे. या कमिटीच्या माध्यमातून महापालिकेविरोधात न्यायालयीन लढा देण्याचा निर्णय या बैठकीत जाहीर करण्यात आला. यावेळी स्मिता साळवे, लता पवार, मंदा येलमामे, रश्मी गांगुर्डे, सूक्ष्मा खांबेकर, लीला शेवाळे आदी अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या. दरम्यान, अंगणवाडी सेविकांच्या भूमिकेला आंस फाउण्डेशननेही पाठिंबा दर्शविला आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका