कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंबेवाडीतील युवकांनी राबविली ग्रामस्वच्छता मोहिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 03:11 PM2020-09-14T15:11:59+5:302020-09-14T15:15:30+5:30

नांदूरवैद्य : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनस्तरावरून वारंवार काळजी घेण्यासाठी तसेच परिसर स्वच्छ राखण्यासाठी सूचना करण्यात येत असून या पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील आंबेवाडी येथील बिरसा ब्रिगेड मित्र मंडळाच्या वतीने संपूर्ण गावामध्ये स्वच्छता मोहीम राबवित स्वच्छतेचा संदेश दिला आहे.

Against the backdrop of Corona, the youth of Ambewadi carried out a village cleaning campaign | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंबेवाडीतील युवकांनी राबविली ग्रामस्वच्छता मोहिम

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंबेवाडीतील युवकांनी राबविली ग्रामस्वच्छता मोहिम

googlenewsNext
ठळक मुद्देस्वच्छता मोहिम राबवित परिसर उजळून टाकला.

नांदूरवैद्य : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनस्तरावरून वारंवार काळजी घेण्यासाठी तसेच परिसर स्वच्छ राखण्यासाठी सूचना करण्यात येत असून या पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील आंबेवाडी येथील बिरसा ब्रिगेड मित्र मंडळाच्या वतीने संपूर्ण गावामध्ये स्वच्छता मोहीम राबवित स्वच्छतेचा संदेश दिला आहे.
गाव स्वच्छ झाले तर देश स्वच्छ होईल. देशाची तसेच गावाची स्वच्छता करण्यासाठी स्वत:पासून सुरूवात करावी. स्वच्छतेतून उज्वलता मिळून एक आरोग्यदायी पिढी निर्माण होईल व गावात कोरोनासारख्या महाभयंकर विषाणूपासून संरक्षण मिळेल या हेतूने संपूर्ण गावामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आल्याचे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे इगतपुरी तालुका उपाध्यक्ष विठ्ठल ठवळे यांनी सांगितले.
गावातील इतरांना स्वच्छतेचा संदेश देत या युवकांनी गावातील अंतर्गत रस्ते, अंगणवाडी, मुख्य मंदिरे, जिल्हा परिषद शाळा, माध्यमिक विद्यालय आदी ठिकाणी स्वच्छता मोहिम राबवित परिसर उजळून टाकला. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सर्वच ठिकाणी उपाययोजना करण्यात येत असून त्याचबरोबर आपण देखील राहत असलेला परिसर स्वच्छ राखण्यासाठी स्वत: पुढाकार घेऊन गावातील इतर नागरिकांना देखील प्रोत्साहित करण्यासाठी मार्गदर्शन केले तर गावात कुठल्याही प्रकारचे रोग पसरणार नाही एवढी काळजी घ्यावी असे यावेळी आवाहन करण्यात आले.
या स्वच्छता अभियानात दत्ता जाधव, जनार्दन केकरे,देव जाधव, रोहित केकरे, एकनाथ खाडे, दत्ता केकरे, तानाजी केकरे, विलास ठवळे, उत्तम ठवळे, जीवन केकरे, समाधान केकरे, सुनील जाधव, विजय ठवळे, युवराज केकरे, आदींसह ग्रामस्थ सहभागी झाले होते.
 

Web Title: Against the backdrop of Corona, the youth of Ambewadi carried out a village cleaning campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.