शहरं
Join us  
Trending Stories
1
आता इस्लामिक देश कतारवरच इराणचा हल्ला, येथेच आहे अमेरिकेचा सर्वात मोठा एअरबेस; सहा क्षेपणास्त्रे डागली
2
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
3
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
4
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
5
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
6
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
7
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
8
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
9
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
10
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
11
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
12
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
13
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
14
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
15
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
16
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
17
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
18
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
19
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
20
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे

दीड वर्षानंतर ‘विहिरींना’ फुटणार पाझर

By admin | Updated: June 20, 2014 01:19 IST

८५ विहिरींची कामे मार्गी लावण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी महात्मा गांधी नाशिक : राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अधिकाऱ्यांना दिले.

नाशिक : नियम डावलून काम केले तर ते बेकायदेशीर अन् काम न करताच पैसे काढले तर तो भ्रष्टाचार होतो, आम्ही तुम्हाला दीड वर्षापासून मंजूर असलेली कामेच करायचे तर सांगतो आहे, ते करा नाही तर गाठ आमच्याशी आहे, असा सज्जड दम आमदार माणिकराव कोकाटे यांनी जिल्हा परिषदेच्या यंत्रणेला भरल्यानंतर सिन्नर पंचायत समितीअंतर्गत दीड वर्षापासून प्रलंबित असलेली सुमारे ८५ विहिरींची कामे मार्गी लावण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अधिकाऱ्यांना दिले.सन २०१२-१३च्या कृती आराखड्यात सिन्नर तालुक्यातील दोडी, नांदूरशिंगोटे, कनकोरी, निऱ्हाळे, पांढुर्ली, पांगरी, आगासखिंड, बेलू, पंचाळे, मऱ्हळ, सुरेगाव या गावांतील सातशे ते आठशे ग्रामस्थांचे विहिरींचे प्रस्ताव ग्रामसभेत मंजूर करून ते सिन्नर पंचायत समितीकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले. गेल्या एक-दीड वर्षापासून ते प्रस्ताव मंजुरीसाठी पडून होते. त्यातच नव्याने तयार करण्यात आलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कृती आराखड्यात या प्रस्तावांचा समावेश नसल्याने संतापलेले पंचायत समिती सभापती बाळासाहेब वाघ यांनी आमदार माणिकराव कोकाटे यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांची भेट घेऊन त्यांना सिन्नर पंचायत समितीतील विस्तार अधिकारी सोनू अहिरे व प्रभारी गटविकास अधिकारी सुनील अहिरे यांच्या कामकाजाबाबत तक्रार केली. आमदार कोकाटे यांनी तर आम्ही तुम्हाला काहीही बेकायदेशीर कामे करण्यास सांगत नसून ग्रामसभेने निवडलेल्या लाभार्थ्यांना तत्काळ त्यांच्या योजनेचा लाभ देण्याचा आग्रह धरीत असल्याचे सांगितले. सुखदेव बनकर यांनी शासन निर्णयाची माहिती घेऊन याबाबत तोडगा काढण्यासाठी रोहयो उपजिल्हाधिकारी जी. एम. गाडगीळ यांच्याशी चर्चा केली. अखेर शासन निर्णयानुसार आधीच्या ग्रामसभेत निवड केलेल्या लाभार्थ्यांना लाभ देता येतो, असे स्पष्ट झाल्याने बनकर यांनी पंचायत समिती कर्मचाऱ्यांना त्यानुसार प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले. यावेळी सभापती राजेश नवाळे, पंचायत समिती सदस्य रामदास खुळे, प्रकाश कदम आदि उपस्थित होते.(प्रतिनिधी)