शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

कामगार सेनेच्या इशाराऱ्यानंतर अखेर 'तो' आदेश मनपा आयुक्तांनी घेतला मागे

By suyog.joshi | Updated: October 5, 2023 13:18 IST

पाणीपुरवठा विभाग उपायुक्त (कर) श्रीकांत पवार यांच्या अधिनस्थ आणण्याचे आदेश मागील महिन्यात घेतले होते.

सुयोग जोशी

नाशिक - महापालिकेच्या पाणीपुरवठा, विद्युत, नगररचना, बांधकाम आदी तांत्रिक संवर्गाशी निगडीत विभाग परसेवेतील उपायुक्तांच्या नियंत्रणाखाली आणण्याचा निर्णय अखेर महापालिका आयुक्त डाॅ.अशोक करंजकर यांनी मागे घेतला आहे. पाणीपुरवठा (विरतण) विभागाचा कार्यभार करसंकलन उपायुक्तांकडून काढून घेण्यात अ‍ाला. तो महापालिका सेवेत परतलेल्या प्रशांत पगार यांच्याकडे सोपविण्यात आला. एकप्रकारे शिवसेना (ठाकरे गट) म्युनसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या इशार्‍यानंतर आयुक्तांना त्यांचा आदेश मागे घ्यावा लागला. महापालिका आयुक्तांनी तो मागे घेतला आहे.

पाणीपुरवठा विभाग उपायुक्त (कर) श्रीकांत पवार यांच्या अधिनस्थ आणण्याचे आदेश मागील महिन्यात घेतले होते. त्यामुळे महापालिकेत स्थानिक विरुध्द परसेवेतील अधिकारी असा संघर्ष उभा राहिला. याप्रश्नी महापालिका कर्मचारी संघटनांनी आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांची भेट घेत या निर्णयास कडाडून विरोध केला होता.म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष सुधाकर बडगुजर यांनी म्हटले कीं,  तांत्रिक संवर्गातील अधिकाऱ्यांना अतांत्रिक संवर्गातील उपायुक्ताच्या अखत्यारीत आणणे बेकायदेशीर आहे. अधीक्षक अभियंता संवर्गातील वरिष्ठ श्रेणीतील अधिकाऱ्याला उपायुक्तपदावरील निम्न श्रेणीतील अधिकाऱ्याच्या अधिनस्थ कामाची जबाबदारी देणे गैर असल्याने आयुक्तांनी यासंदर्भातील आदेश तातडीने रद्द करावेत, अशी आग्रही मागणी बडगुजर यांनी केली. अखेर या मागणीस यश आले आहे. अखेर आयुक्तांनी  तांत्रिक संवर्गातील पाणीपुरवठा विभाग अतांत्रिक संवर्गातील उपायुक्तांच्या अखत्यारीत आणण्याच्या स्थानिक अधिकाऱ्यांविरोधात परसेवेतील अधिकाऱ्यांना बळ देणाऱा  वादग्रस्त आदेश मागे घेतला.आयुक्तांची भेट घेत प्रशासनाची झालेली चूक निदर्शनास आणून दिली होती. तांत्रिक सवर्गातील उपअभियंता व उपायुक्त यांची वेतनश्रेणी समान आहे.कार्यकारी अभियंता व अधीक्षक अभियंता या दोन्ही पदावरती काम करणारे वरिष्ठ वेतन श्रेणी मध्ये येतात. त्यामुळे उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याच्या हाताखाली वरिष्ठ तांत्रिक संवर्गातील अधिकारी काम करणार नाही. त्यामुळे झालेली चूक दुरुस्त करावी अशी विनंती  केली होती. त्यानुसार आयुक्तांनी दुरुस्ती आदेश काढला. - सुधाकर बडगुजर, अध्यक्षम्युनसिपल कर्मचारी कामगार सेना

टॅग्स :NashikनाशिकMuncipal Corporationनगर पालिकाShiv Senaशिवसेना