कळवण : तालुक्यात परतीच्या पावसाने शेतकºयांचं मोठं नुकसान झाल आहे. अनेक हाता-तोंडाशी आलेली पिकं वाया गेली. या नुकसानग्रस्त शेतकºयांना दिलासा देण्यासाठी आणि पिकांची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आमदार नितीन पवार हे थेट शेतकºयांच्या बांधावर दाखल झाल्यानंतर शासकीय यंत्रणा जागी झाली असून रविवारी यंत्रणेने दह्याणे पाळे, विठेवाडी परिसरात पाहणी केली.आमदार नितीन पवारांनी चार दिवसापूर्वी नुकसानीचा अहवाल शरद पवार यांना सादर करु न कळवण तालुक्यातील शेतकर्यांच्या समस्याकडे लक्ष वेधून घेतले होते. या पाशर््वभूमीवर शरद पवार यांच्या कळवण दौर्याला विशेष महत्व प्राप्त झाले होते. पवारांच्या दौर्यानंतर शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आमदार पवारांनी पाच दिवसापूर्वी तालुक्यात दौरा करु न नुकसानीची पहाणी करु न महसूल व कृषी यंत्रणेला वस्तुनिष्ठ पंचनामे करु न बांधावर जाऊन परिस्थिती जाणून घेण्याची सूचना केली होती.कळवण तालुक्यात गेल्या काही दिवसांपासुन सुरु असलेल्या अवकाळी पावसाने शेतकरÞ्यांचा तोंडचा घास हिरावला असुन शेतीपिकांचे मोठे नुकसान झालेले असल्याने सरकारने योग्य ती मदत शेतकरÞ्यांना तातडीने करावी अशी मागणी आमदार नितीन पवार, यांनी नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्याकडे केली आहे. आज जिल्हा परिषद सदस्य यशवंत गवळी, तहसीलदार बी ए कापसे, गटविकास अधिकारी डी एम बिहरम तालुका कृषी अधिकारी विजय पाटील यांनी दह्याणे पाळे येथील पांडुरंग रामभाऊ पाटील यांच्या मका व विठेवाडी येथील जयवंताबाई नामदेव गवळी यांच्या सोयाबीन, व पंढरीनाथ लक्षमण गवळी यांच्या कांदे रोपाची पहाणी केली.अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेतिपकामध्ये गुडघाभर पाणी साचले असून अनेक शेतकर्यांच्या शेतात पाणी घुसल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान असून मका, सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी खळ्यांवर काढून ठेवलेल्या मक्याची कणसे, सोयाबीन पाण्यात सडणार आहे.पावसाळी वातावरण सलग आठ दिवस कायम राहील्याने कळवण तालुक्यातील शेतीपिके धोक्यात आले आहेत. या वातावरणामुळे शेती आण िशेतकरी दोन्ही संकटात सापडले आहेत.शेतीपिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याने शेतकरी हवालिदल झाला आहे सोयाबीन, बाजरी,ज्वारी, मका पिकांना कोंब फुटले असून हाताशी आलेला घास गेला आहे. परतीच्या या पावसाचा रब्बी पिकांना फायदा होणार असला तरी या पावसाचा सोयाबीन, मका, ज्वारी, बाजरी अशा बहरलेल्या खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. खिरपातील पिके हाता-तोंडाशी आल्यानंतर सतत पडणार्या या पावसामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
शरद पवारांच्या दौऱ्यानंतर शासकीय यंत्रणा जागी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 22:53 IST
कळवण : तालुक्यात परतीच्या पावसाने शेतकºयांचं मोठं नुकसान झाल आहे. अनेक हाता-तोंडाशी आलेली पिकं वाया गेली. या नुकसानग्रस्त शेतकºयांना दिलासा देण्यासाठी आणि पिकांची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आमदार नितीन पवार हे थेट शेतकºयांच्या बांधावर दाखल झाल्यानंतर शासकीय यंत्रणा जागी झाली असून रविवारी यंत्रणेने दह्याणे पाळे, विठेवाडी परिसरात पाहणी केली.
शरद पवारांच्या दौऱ्यानंतर शासकीय यंत्रणा जागी
ठळक मुद्देकळवण : तालुक्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच मोठं नुकसान