सात महिन्यांनी भरला आठवडे बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 10:37 PM2020-10-23T22:37:08+5:302020-10-24T02:51:59+5:30

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नाशिक - पुणे राष्ट्रीय महामार्गावरील परिसरातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या नांदूरशिंगोटे येथील आठवडे बाजार कोरोनामुळे ...

After seven months the market filled up | सात महिन्यांनी भरला आठवडे बाजार

सात महिन्यांनी भरला आठवडे बाजार

googlenewsNext
ठळक मुद्दे नांदूरशिंगोटे : शेतकरी, व्यापाऱ्यांसह नागरिकांना दिलासा; ग्राहकांची वर्दळ

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नाशिक - पुणे राष्ट्रीय महामार्गावरील परिसरातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या नांदूरशिंगोटे येथील आठवडे बाजार कोरोनामुळे तब्बल सात महिन्यांनंतर भरल्यामुळे शेतकऱ्यांसह छोटे-मोठे व्यापारी व नागरिकांना दिलासा मिळाला आहे. कोरोनामुळे गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेली बाजारपेठ सुरू झाल्याने पहिल्या दिवशी ग्राहकांची वर्दळ वाढली होती. 
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने राज्यातील सर्व आठवडे बाजार बंद केले होते. आता काही नियम शिथिल करून आठवडे
बाजारांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे कित्येक दिवसांनंतर प्रथमच शुक्रवारी नांदूरशिंगोटेचा आठवडे बाजार भरला. यावेळी किरकोळ विक्रेत्यांसह ग्राहकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. बाजारात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भाजीपाला विक्रीसाठी आणला होता. बाजार सुरू झाल्याने ग्रामीण भागातील भाजीपाला विक्रेते, किरकोळ विक्रेते, किराणा व्यावसायिक आदी दुकानांची बाजारपेठ उपलब्ध झाल्याने विक्रेते व ग्राहक यांच्यामध्ये समाधानाचे वातावरण पहायला मिळाले. 

Web Title: After seven months the market filled up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Marketबाजार