शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

पावसानंतर आता साथीच्या आजाराचे थैमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 16:34 IST

निफाड तालुका : शेतशिवारात साचले पाणी

ठळक मुद्देथंडीताप व खोकला या मुळे लहान मुले हैराण झाली असून खासगी दवाखान्यात उपचारांसाठी गर्दी होताना दिसत आहे.

चांदोरी : पावसाने धुडगूस घातल्यानंतर आता निफाड तालुका परिसरात विविध साथीच्या आजारांनी थैमान घातले असून नागरिक हैराण झाले आहेत. गावात-शेतशिवारात पाण्याची डबकी साचली असून गवत वाढल्यामुळे डेंग्यूसदृश थंडी ताप, खोकला व साथीच्या आजारांच्या रु ग्णात वाढ झाली आहे. खासगी दवाखाने हाऊसफुल झाले आहेत.गेल्या काही दिवसात भरपूर पाऊस झाल्याने शेतशिवारासह गावांमध्ये चिखल साचून डबकी तयार झाली आहेत. गाजरगवतही मोठया प्रमाणात उगवले आहे. डबक्यामध्ये कचरा ,गवत ,चिखल असल्याने मोठया प्रमाणत दुर्गंधी येत आहे. याशिवाय डासांची मोठया प्रमाणत पैदास होत आहे. त्यामुळे डेंग्यूसदृश रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. याशिवाय, थंडीताप व खोकला या मुळे लहान मुले हैराण झाली असून खासगी दवाखान्यात उपचारांसाठी गर्दी होताना दिसत आहे. काहींना चांदोरी, निफाड ,ओझर किंवा नाशिक येथे जावे लागत आहे. डास नियंत्रणासाठी आरोग्य विभागाने व ग्रामपंचायतीने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.दारणासांगवी येथील बोडके वस्ती ते कदम वस्ती या दरम्यान गेल्या चार महिन्यांपासून पाणी साचलेले असून या संदर्भात काही दिवसांपूर्वी सरपंचांसह तलाठ्यांकडून आढावा घेण्यात आला होता. परंतु, पुढे कार्यवाही झालेली नाही.आणखी ठोस उपाययोजनाडासांची पैदास होऊ नये यासाठी ग्रामपंचायतच्या वतीने उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच गावात व मळ्यात धूरळणी केली आहे. गरज पडल्यास आणखी ठोस उपाययोजना राबविल्या जातील. सर्व नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवावा.- संगीता माळी, सरपंच, दारणसांगवी

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊस