शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-पुण्यापाठोपाठ नाशिक शहर ‘डेंग्यू’च्या डेंजर झोनमध्ये कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 18:32 IST

चिंताजनक : २०१७ मध्येही ९०० हून अधिक रुग्णांना लागण

ठळक मुद्देसन २०१७ मध्ये वर्षभरात २१६८ संशयितांपैकी ९४१ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याची नोंदकर्मचा-यांचा अभाव व पेस्टकंट्रोलबाबत वाढत्या तक्रारी यामुळे डेंग्यूवर नियंत्रण मिळविणे अवघड

नाशिक - गेल्या तीन वर्षांपासून नाशिक शहर डेंग्यूच्या विळख्यातून अद्याप बाहेर पडलेले नाही. मुंबई-पुण्यानंतर नाशिक ‘डेंग्यू’च्या डेंजर झोनमध्ये कायम असून सन २०१७ मध्ये वर्षभरात २१६८ संशयितांपैकी ९४१ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याची नोंद महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या दप्तरी आहे.गेल्या तीन वर्षांपासून नाशकात डेंग्यूच्या आजाराने नागरिकांना त्रस्त करून सोडले आहे. महापालिकेकडे असणारा कर्मचा-यांचा अभाव व पेस्टकंट्रोलबाबत वाढत्या तक्रारी यामुळे डेंग्यूवर नियंत्रण मिळविणे अवघड होऊन बसले. डिसेंबर २०१७ मध्ये डेंग्यूचे ३७४ संशयित रुग्ण आढळून आले. त्यातील १६९ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे. डिसेंबर महिन्यात पहिल्या आठवड्यात १८७, दुस-या आठवड्यात ९०, तिसºया ६१ तर चौथ्या आठवड्यात ३६ रुग्ण आढळून आले आहेत. नोव्हेंबर महिन्यात ६४४ संशयितांपैकी २७६ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे निदर्शनास आले होते. डिसेंबर महिन्यात डेंग्यूचा प्रभाव काही प्रमाणात ओसरला असला तरी धोका मात्र कायम आहे. सन २०१६ मध्ये २३६९ संशयितांपैकी ९३० रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याची नोंद आहे तर सन २०१७ मध्ये २१६८ संशयितांपैकी ९४१ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे आढळून आले आहे. गेल्या दोन वर्षांपासून डेंग्यूच्या रुग्णसंख्येत फरक पडलेला नाही. त्यामुळे डेंग्यूच्या डेंजर झोनमध्ये नाशिक अजूनही कायम आहे. महापालिकेच्यावतीने डेंग्यूच्या नियंत्रणासाठी प्रबोधनपर मोहीम राबविली जात असली तरी पुरेशा कर्मचा-यांअभावी ती सर्वांपर्यंत जाऊन पोहोचू शकलेली नाही. दरम्यान, महापालिकेने आता नवीन बांधकामे आणि गॅरेजेस यांच्याकडे लक्ष केंद्रीत केले असून डेंग्यूच्या डासांच्या अळ्या आढळून आल्यास संबंधितांना नोटीसा बजावण्याचे काम सुरू आहे. लवकरच याबाबत दंडात्मक कारवाई करण्यासंबंधीचा प्रस्ताव महासभेवर सादर केला जाणार असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.आता मलेरियाचा धोकाजानेवारी महिन्यात जसे ऊन पडू लागेल त्यानुसार नदी-नाले, गटारीच्या तुंबलेल्या पाण्यात क्यूलेक्स जातीच्या मच्छरांची उत्पत्ती वाढत जाईल. मादी क्यूलेक्स मच्छर ही मलेरियाची वाहक समजली जाते. त्यामुळे आता मलेरियाचा धोका वाढणार असून त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील नदी-नाले तसेच तुंबलेल्या गटारी साफ करण्याविषयी बांधकाम विभागाला पत्र दिले आहे. याशिवाय, गोदावरी संवर्धन कक्षामार्फत गोदावरी नदीतील गाळ, घाण-कचरा काढण्याचे काम सुरू आहे. सेप्टीक टॅँकमध्येही फवारणी करण्याचे आदेश पेस्टकंट्रोल ठेकेदाराला देण्यात आले आहेत.

टॅग्स :dengueडेंग्यूNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका