शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीची राजेंद्र हगवणेंवर कारवाई; पक्षातून बडतर्फ केलं, वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी अजित पवारांनी कारवाईचे दिले आदेश
2
अमेरिकेत इस्रायली दुतावासाच्या दोन कर्मचाऱ्यांची हत्या; ज्यूइश म्युझिअमबाहेर गोळीबार
3
किश्तवाडमध्ये ३-४ दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी घेरले; चकमक सुरु, पहलगाम हल्ल्यातील दहशतवादांचा शोध सुरु...
4
डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा बायोपिक रुपेरी पडद्यावर येणार, दिग्दर्शक ओम राऊतची घोषणा
5
१२ वर्षे तुरुंगात; वॉचमनला भरपाई देणार तरी कोण? चिमुरडीवर अत्याचार करणार खरा आरोपी आजही मोकाटच 
6
प्लेऑफ्सची लढाई जिंकली! पण Qualifier 1 च्या शर्यतीत MI स्वबळावर टिकणं मुश्किल, कारण...
7
एलओसीच नाही, नेपाळच्या सीमेवरून दहशतवादी घुसखोरीच्या प्रयत्नात; ३७ जण दबा धरून बसलेत...
8
उत्तर कोरियाची नवीकोरी युद्धनौका पाण्यात जाताना कोसळली; किम जोंग उन भडकले, सैन्यालाच कारवाईची धमकी दिली
9
"असं वाटलं मृत्यू समोर आलाय", इंडिगो विमानात अडकलेल्या तृणमूल कॉँग्रेसच्या नेत्या सागरिका घोष यांनी सांगितली आपबिती
10
वेतनवाढीच्या एक दिवस आधी निवृत्त झाले तरी पेन्शनमध्ये लाभ मिळणार : सरकार
11
अपरा एकादशी: पापांचा नाश अन् चुकांना क्षमा; पाहा, महत्त्व अन् मान्यता, ‘अशी’ करा व्रत पूजा
12
ज्योतीने इस्लाम धर्म स्वीकारला, दहशतवाद्यांसोबत संबंध, पाकिस्तानीसोबत लग्न केले?; पोलिसांनी सगळंच सांगितलं
13
कान्सची राणी! कपाळी कुंकू अन् पांढरी साडी परिधान करत ऐश्वर्या रायने दाखवलं भारतीय संस्कृतीचं दर्शन
14
VIDEO : तुफान गारपिटीत सापडले विमान, वैमानिकाने सुखरूप उतरवले; प्रवाशांत प्रचंड घबराट; करु लागले देवाचा धावा
15
शुक्रवारी अपरा एकादशी: ७ राशींवर लक्ष्मी-नारायण कृपा, लाभच लाभ; भरभराट काळ, हाती पैसा राहील!
16
पत्रकाराने असा काय प्रश्न विचारला की डोनाल्ड ट्रम्प यांचा पारा चढला? म्हणाले "चल निघ इथून..."
17
आजचे राशीभविष्य, २२ मे २०२५: नशिबाची साथ, मान-सन्मान; यश, कीर्ती, धन प्राप्तीचा दिवस
18
जगातील कुठलेही क्षेपणास्त्र राेखणार अमेरिकेचे ‘गोल्डन डोम’ कवच, US ला कुणाचा धोका? 
19
झेलेन्स्कींसारखेच डोनाल्ड ट्रम्प यांचे दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी वाजले; रामाफोसा संबंध सुधारण्यासाठी आलेले...  
20
अयोध्येतील श्रीराम मंदिरात व्हिआयपींशिवाय ५ जून रोजी होणार राम दरबार प्राणप्रतिष्ठा सोहळा

कार्यवाही कुंभमेळ्यानंतर : पालकमंत्र्यांचा निर्वाळा

By admin | Updated: July 12, 2015 00:14 IST

महंत ग्यानदास यांच्या सूचनांना ‘खो’

नाशिक : रामकुंडावर स्नानासाठी अडथळा ठरणारे वस्त्रांतरगृह पाडणे असो की, स्विमिंग पुलासारखा भासणाऱ्या रामकुंडाभोवतीचे सीमेंट क्रॉँकिट काढणे असो अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास यांनी केलेल्या सूचनांचे कोणतेही पालन सिंहस्थ कुंभमेळ्यात केले जाणार नसल्याचे शुक्रवारी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. आता जे काही होईल ते सारे सिंहस्थ कुंभमेळ्यानंतर असे सांगून महाजन यांनी अप्रत्यक्ष साधू-महंतांनी यापूर्वी केलेल्या सूचनांना किंमत नसल्याचे दाखवून दिले आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीची पाहणी व धर्मध्वजारोहण सोहळ्याच्या तयारीच्या दृष्टीने बोलविलेल्या बैठकीसाठी शनिवारी पालकमंत्री गिरीश महाजन यांचे नाशिकला आगमन झाले. दुपारी चार वाजता त्यांनी रामकुंड व परिसराला भेट देऊन तयारीची पाहणी केली व त्यानंतर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या. रामकुंडावरील विविध मंदिरांना केली जात असलेली रंगरंगोटी योग्य पद्धतीने व त्यात रंगसंगती साधली जावी, अशी सूचना केली तसेच कपालेश्वर मंदिराच्या समोर असलेल्या जलकुंभावर पोलिसांनी दहशतवाद जनजागृतीबाबत लावलेला फलक तातडीने काढून टाकावे, असे आदेश दिले. अधिक मास व पुढे कुंभमेळा असल्याने रामकुंडावर भाविकांची कायमस्वरूपी गर्दी राहील ते पाहता रामकुंडात टाकले जाणारे पाने, फुले यांची त्वरित विल्हेवाट लावली जावी तसेच भाविकांसाठी पाणी वाहते कसे राहील याची दक्षता अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे सांगितले. गोदाघाटावरील पुलांना वेगवेगळे रंग दिले जावे, जेणे करून त्याची त्वरित ओळख पटेल असे सांगून, गोदाकाठी शासकीय वा खासगी इमारतींना एकसारखा रंग देऊन त्याची शोभा वाढवावी त्याचप्रमाणे जाहिरात फलकांमध्येही साम्य असण्यासाठी काय करता येईल याचा अधिकाऱ्यांनी अभ्यास करावा, अशा सूचना केल्या. तासभर चाललेल्या या पाहणीनंतर पत्रकारांशी बोलताना महाजन यांनी, सिंहस्थ कुंभमेळ्याची ९० टक्के कामे चांगल्या पद्धतीने पूर्ण झाल्याचे सांगितले. रामकुंडावरील वस्त्रांतरगृह पाडणे तसेच रामकुंडाला विळखा घातलेल्या सीमेंट क्रॉँक्रिट काढून रामकुंडाचे नैसर्गिक झरे मोकळे करण्याची साधू-महंतांनी केलेल्या सूचनांचे पालन करणे आता शक्य नसल्याचे सांगून, या संदर्भात आपली चर्चा झाली असून, कुंभमेळा पार पाडल्यानंतर त्याबाबतचा विचार करू असा निर्वाळा त्यांनी दिला. (प्रतिनिधी)