पतीवियोगानंतर पत्नीने सोडला प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:14 IST2021-04-17T04:14:19+5:302021-04-17T04:14:19+5:30

विमल वसंत पगार व वसंत नारायण पगार यांना २ मुले व २ मुली असून, कळवण शहरातील हॉटेल ...

After his divorce, his wife died | पतीवियोगानंतर पत्नीने सोडला प्राण

पतीवियोगानंतर पत्नीने सोडला प्राण

विमल वसंत पगार व वसंत नारायण पगार यांना २ मुले व २ मुली असून, कळवण शहरातील हॉटेल व्यावसायिक व प्रगतशील शेतकरी म्हणून वसंत पगार यांची ओळख होती. विमलबाई यांनी पगार कुटुंबाची धुरा खांद्यावर घेऊन सर्वांशी आपुलकीचे नाते जपले होते. त्यामुळे त्यांच्या जाण्याने पगार परिवारामध्ये खूप हळहळ व्यक्त झाली. कोरोनाच्या महामारीने ४ मुलांचे आई-वडिलांचे छत्र हरवले. सदैव हसतमुख असलेले वसंत पगार कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे नाशिकच्या खासगी रुग्णालयात त्यांना दाखल केले. त्यांच्याबरोबर विमलबाई यांनादेखील दाखल करण्यात आले. २३ मार्च रोजी वसंत पगार यांच्यावर औषधोपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. पतीचे निधन झाल्याचे विमलबाईंना दुसऱ्या दिवशी समजताच दुःख अनावर झाल्याने त्यांनीही जगाचा निरोप घेतला.

फोटो- १६ पगार निधन

===Photopath===

160421\16nsk_31_16042021_13.jpg

===Caption===

फोटो- १६ पगार निधन

Web Title: After his divorce, his wife died