मनमाड: मनमाड कारांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसला शनिवारी हिरवा कंदील दाखवण्यात आल्याने तब्बल साडे पाच महिन्यांच्या विश्रांती नंतर सदरची गाडी मुंबईकडे रवाना झाली .शनिवारपासून गाडी क्रमांक ०२११० मनमाड - मुंबई व ०२१०९ मुबई मनमाड या विशेष गाड्या सुरू करण्यात आल्याने चाकरमान्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये रेल्वे सेवा बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर हळूहळू रेल्वे आपली सेवा सुरू करत आहे. प्रवासी कामगारांसाठी आधी रेल्वे सेवा सुरू करण्यात आली होती.आजपासून आणखी ८० गाड्या सुरू करण्यात आल्या आहे. त्यामध्ये देशात निर्माण झालेल्या कोरोना विषाणूच्या प्रभावा मुळे देशातील संपूर्ण रेल्वे सेवाच इतिहासात पहिल्यांदाच थांबण्यात आली होती. रेल्वे सेवा थांबल्याने संपुर्ण देशातील अनेक प्रवासी नागरिकांना या काळात खुप अडचणी सहन कराव्या लागल्या होत्या.परंतु आता भारतीय रेल्वे मंडळ हे टप्या-टप्या ने देशातील आणि राज्यातील रेल्वे सेवा सुरू करून पूर्वी प्रमाणे रेल्वे रुळावर येत आहे. मनमाड ते मुंबई रेल्वे प्रवास करणाºया हजारो नागरिकांची रोजची जीवन वाहिनी असणारी पंचवटी एक्सप्रेस ही सुरू झाली . तब्बल साडेपाच महिन्यांच्या विश्रांती नंतर आज मनमाड हुन मुंबई च्या दिशेने पंचवटी एक्सप्रेस रवाना झाली. या गाडीत फक्त आरक्षण करूनच प्रवास करता येणार आहे.सर्व साधारण तिकीट आणि मासिक पास काढून प्रवाशांना प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे. (१२ मनमाड १/२/३)
पाच महिन्यांनंतर पंचवटी एक्सप्रेस मुंबईकडे रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 00:14 IST
मनमाड: मनमाड कारांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसला शनिवारी हिरवा कंदील दाखवण्यात आल्याने तब्बल साडे पाच महिन्यांच्या विश्रांती नंतर सदरची गाडी मुंबईकडे रवाना झाली .
पाच महिन्यांनंतर पंचवटी एक्सप्रेस मुंबईकडे रवाना
ठळक मुद्देचाकरमान्यांमध्ये समाधान : मनमाडकरांच्या जीवन वाहिनीला हिरवा कंदील!