शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीनंतर शाळेसाठी  शिक्षकांची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2019 00:13 IST

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सोमवारी (दि.२९) मतदान झाल्यानंतर निवडणुकीच्या कामकाजासाठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी नाशिक जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांची निवडणूक कर्मचारी म्हणून मोठ्या प्रमाणात नेमणूक केली होती

नाशिक : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सोमवारी (दि.२९) मतदान झाल्यानंतर निवडणुकीच्या कामकाजासाठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी नाशिक जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचीनिवडणूक कर्मचारी म्हणून मोठ्या प्रमाणात नेमणूक केली होती. या सर्व शिक्षकांना मतदानाच्या दुसºया दिवशी शाळेत हजर रहावे लागल्याने जवळपास ४८ तासांच्या अविरत कर्तव्यानंतर शाळेत पोहोचताना त्यांची मोठी दमछाक झाली. शिक्षक संघटनांनी केलेल्या सुट्टीच्या मागणीला शिक्षण विभागाने केराची टोपली दाखविल्याने शिक्षकांची अशी ससेहोलपट झाल्याचा आरोप विविध शिक्षक संघटनांनी केला आहे.शिक्षकांना आपल्या मुख्यालयाबाहेर निवडणुकीची जबाबदारी सोपवलेली असल्याने पुन्हा आपल्या मुख्यालयी पोहोचण्यासाठी सर्व शिक्षकांना कसरत करावी लागली. काही शिक्षक शाळांमध्ये नियमित वेळेत उपस्थित राहू शकले नाही. परंतु, शिक्षण विभागाने ज्याप्रमाणे शिक्षकांच्या मागणीची दखल घेतली नाही. त्याचप्रमाणे संबंधित सर्व शिक्षक पुन्हा नियमित वेळेत शाळेत दाखल झाले की नाही याविषयी कोणतीही माहिती घेतली नाही. लोकसभा निवडणुकीत सोमवारी (दि.२९) सायंकाळी उशिरा मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुन्हा मंगळवारी सकाळी शाळेत कसे पोहोचणार, असा सवाल उपस्थित करीत शिक्षकांना निवडणुकीच्या दुसºया दिवशी सुटी मिळावी, अशी मागणी नाशिक जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांनी केली होती. मात्र जिल्हा परिषद प्रशासनाने शिक्षकांच्या मागणीला केराची टोपली दाखवत कोणताही प्रतिसाद दिला नव्हता. त्यामुळे जिल्हाभरातील विविध शाळांमधील शिक्षकांना मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर रात्रीचा प्रवास करून आपल्या शाळेत वेळेत पोहोचण्यासाठी धावपळ करावी लागली.शिक्षकांना अधिकृत सुट्टी नाहीकाही शिक्षक दळणवळणाच्या सुविधांअभावी शाळेत नियमित वेळेत पोहचू शकले नाही. अशा शिक्षकांची संख्या जवळपास २० ते २५ टक्के असल्याची माहिती सूत्रांंनी दिली. परंतु, शिक्षण विभागाने शिक्षकांना अधिकृत सुट्टी दिलेली नाही. त्यामुळे याविषयी कोणतीही माहिती घेतली नसल्याचे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांनी सांगितले.

टॅग्स :Teacherशिक्षकSchoolशाळाElectionनिवडणूकnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद