शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
3
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
4
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
5
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
6
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
7
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
8
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
9
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
10
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
11
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
12
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
13
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
14
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
15
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
16
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
17
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
18
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
19
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
Daily Top 2Weekly Top 5

ड्रेनेजबळीनंतरही मनपा बेफिकीर

By admin | Updated: September 11, 2015 23:49 IST

सुरक्षा वाऱ्यावर : द्वारका परिसरात आला प्रकार निदर्शनास

नाशिक : गेल्या नऊ महिन्यांच्या कालावधीत आनंदवल्ली आणि सातपूर औद्योगिक वसाहतीत ड्रेनेजच्या चेंबरमध्ये गुदमरून पाच जणांचे बळी गेल्याच्या दुघटनेनंतरही महापालिका प्रशासन सफाई कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेविषयी किती बेफिकीर आहे, याचे दर्शन शुक्रवारी द्वारकावर घडले. हॉटेल राधिकाजवळ चेंबरमध्ये उतरून कोणत्याही सुरक्षासाधनांशिवाय काम करणाऱ्या सफाई कामगाराचे छायाचित्रच पुराव्यादाखल माजी विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांनी माध्यमांसमोर ठेवले आहे.मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये आनंदवल्ली येथील चेंबरमध्ये तिघांचे बळी गेले होते, तर गेल्या शनिवारी सातपूर औद्योगिक वसाहतीतील साईश इंजिनिअरिंग कंपनीत ड्रेनेजच्या चेंबरमध्ये महापालिकेच्या एका सफाई कर्मचाऱ्याबरोबरच खासगी कामगाराचा मृत्यू झाला होता. या घटनेचे तीव्र पडसाद बुधवारी झालेल्या महासभेत उमटले. यावेळी सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरत सफाई कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेविषयी चिंता व्यक्त केली होती. भारत सरकारच्या राजपत्रानुसार सफाई कर्मचाऱ्यांना चेंबरमध्ये उतरविण्यात येऊ नये, तसे केल्यास संबंधित दोषींना कारावास व दंडाची तरतूद असलेली शिक्षा असल्याचेही सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले होते. तीन तासांच्या चर्चेनंतर, महापौरांनी सफाई कर्मचाऱ्यांना चेंबरमध्ये उतरविण्यात येऊ नये आणि त्यांना सुरक्षा साधने पुरविण्याबाबत दक्षता घेण्याचे आदेश खातेप्रमुखांना दिले होते. महासभेने दिलेल्या आदेशाला दोन दिवस उलटत नाही तोच शुक्रवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास माजी विरोधी पक्षनेते व नगरसेवक सुधाकर बडगुजर यांना द्वारकावरील हॉटेल राधिकाजवळ ड्रेनेजच्या चेंबरमध्ये एक कर्मचारी उतरून कोणत्याही सुरक्षासाधनांविना हाताने मैला काढत असल्याचे निदर्शनास आले. बडगुजर यांनी आपले वाहन थांबवून कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता, सदर कर्मचाऱ्यांनी आमचे हे रोजचेच काम असल्याचे आणि कोणतेही साधने नसल्याचे सांगितले. नऊ महिन्यांत ड्रेनेजने पाच बळी घेऊनही आणि महासभेने सुरक्षाविषयक दिलेले आदेश ताजे अजूनही प्रशासन मात्र कर्मचाऱ्यांप्रती किती बेफिकीर आहे, याचाच प्रत्यय या प्रकारामुळे समोर आला आहे. (प्रतिनिधी)दोनच दिवसांपूर्वी महासभेत प्रशासनाच्या कारभारावर सदस्यांनी हल्लाबोल केला होता. तरीही प्रशासन त्यापासून काही धडा घेऊ शकलेले नाही. शुक्रवारी मी द्वारकावरून जात असताना सदरचा प्रकार नजरेस आला. दुर्घटनेनंतरही महापालिका बेफिकीर आहे. सदर प्रकार आपण सफाई कर्मचारी आयोगाच्या निदर्शनास आणून देणार असून, तसे पुरावेही देणार आहोत. सफाई कर्मचाऱ्यांच्या जिवाशीच खेळण्याचा हा प्रकार आहे. - सुधाकर बडगुजर, नगरसेवक