शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

सायकलीने पाठलाग करून नाशिकमध्ये वाळूचा ट्रक पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 14:32 IST

नाशिक : शहरात बेकायदेशीरपणे वाळू तस्करी करण्याचा प्रकार सुरूच असून, सोमवारी सकाळी त्र्यंबकरोडने भरधाव वेगाने वाळू घेवून जाणारा मालट्रक प्रभारी प्रांत अधिकारी सोपना कासार यांनी सायकलीने पाठलाग करून पकडला. नंदुरबार जिल्ह्यातून सदरची वाळू नाशिक शहरात विक्रीसाठी आणली जात असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे प्रांत कासार हे सायकलीने फिरण्यासाठी शहरात ...

ठळक मुद्देवाळू वाहतूक करणारा ट्रक पकडलाप्रांतांची कारवाई : मॉर्नींग वॉक पथ्यावर

नाशिक : शहरात बेकायदेशीरपणे वाळू तस्करी करण्याचा प्रकार सुरूच असून, सोमवारी सकाळी त्र्यंबकरोडने भरधाव वेगाने वाळू घेवून जाणारा मालट्रक प्रभारी प्रांत अधिकारी सोपना कासार यांनी सायकलीने पाठलाग करून पकडला. नंदुरबार जिल्ह्यातून सदरची वाळू नाशिक शहरात विक्रीसाठी आणली जात असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे प्रांत कासार हे सायकलीने फिरण्यासाठी शहरात फेरफटका मारत असताना आठ वाजता त्र्यंबकरोडवरील मायको सर्कलवरून भरधाव वेगाने वाळूचा ट्रक (क्रमांक एम. एम. १५ डी. के. ६८०६) हा जात असल्याचे पाहून कासार यांनी ट्रकचा पाठलाग केला. पुढे हा ट्रक शरणपुर चौकीच्या वाहतूक सिग्नलवर थांबला असता कासार यांनी चालक देवेंद्र शेलार याला विचारणा केली असता, तो पर्यंत ट्रकचे मालक रामदास नाथा ठोंबरे व त्यांचे आणखी काही साथीदारांनी ट्रकभोवती गर्दी केली. कासार यांनी वाहतूक परवाना तपासला असता, पावतीची मुदत संपुष्टात आल्याचे निदर्शनास आले. यावेळी उपस्थितांनी कासार यांच्यावर दबाव टाकण्याचाही प्रयत्न केला. परंतु कासार यांनी तात्काळ तलाठ्यांना पाचारण करून ट्रकचा पंचनामा करून तो ताब्यात घेतला. नंदुबार जिल्ह्यातील नंदारखेडा ता. शहादा येथून ही वाळू आणण्यात आली असून, शहरात अशा प्रकारे मध्यरात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर तस्करीने वाळूचे शेकडो ट्रक बेकायदेशीरपणे आणले जात आहेत. यापुर्वीही कासार यांनी सकाळी मॉर्निंग वॉकला जातांना पाठलाग करून ट्रक पकडला होता.

 

टॅग्स :sandवाळूNashikनाशिक