शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
2
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
3
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
4
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
5
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
6
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
7
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
8
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
9
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
10
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
11
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
12
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
13
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
14
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
15
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
16
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
17
अमेरिकेचा 88 लाखांचा H-1B व्हिसा आजपासून लागू; भारतीयांना मोठा दिलासा...
18
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
19
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."
20
Alyssa Healy : बॅक टू बॅक सेंच्युरी, तरीही स्टार्कच्या बायकोवर आली बाकावर बसण्याची वेळ; कारण...

बजेटनंतर शहरातील पेट्रोलपंपांवर लागलीच इंधन दरवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 00:49 IST

केंद्राच्या अर्थसंकल्पात इंधनावर कर लावण्यात आल्यामुळे पेट्राल आणि डिझेलची दरवाढ होणे निश्चित होताच दुपारनंतर शहरातील काही पेट्रोलपंपांवर जादा दराने पेट्रोल, डिझेलची विक्री करण्यात आल्याचा अनुभव अनेक वाहनधारकांना आला.

नाशिक : केंद्राच्या अर्थसंकल्पात इंधनावर कर लावण्यात आल्यामुळे पेट्राल आणि डिझेलची दरवाढ होणे निश्चित होताच दुपारनंतर शहरातील काही पेट्रोलपंपांवर जादा दराने पेट्रोल, डिझेलची विक्री करण्यात आल्याचा अनुभव अनेक वाहनधारकांना आला.एरव्ही अर्थसंकल्पात एखादी वस्तू स्वस्त झाली की लागलीच स्वस्त विकली जात नाही, मात्र काही ठिकाणी संंबंधित पेट्रोलपंपचालकांनी दरवाढीची दाखविलेली तत्परता चर्चेचा आणि टीकेचाही विषय ठरली.केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी इंधनवर कर आकारल्यामुळे साहजिकच इंधनाचे दरवाढ होणार आहे. मात्र ही दरवाढ कधी होणार याचा उल्लेख नसल्याने संभाव्य वाढ लक्षात घेऊन शहर परिसरातील काही पेट्रोलपंपचालकांनी डिझेल दोन रुपये ३० पैसे, तर पेट्रोल २ रुपये ५० पैसे वाढविल्याची तक्रार समोर आली. साधारणपणे दुपारी ३ वाजेनंतर अशा प्रकारची दरवाढ काही ठिकाणी करण्यात आली. याचा फटका काही वाहनधारकांना नक्कीच बसला.इंधनावर कर वाढविण्यात आल्यामुळे दरवाढ अटळ झाल्यामुळे सर्वत्र या वाढीविषयी तीव्र प्रतिक्रिया उमटत असल्याने याबाबत आणखी काही फेरबदल होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनीच या दरवाढीला विरोध दर्शविला आहे. या दरवाढीमुळे महागाईत भर पडेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. या सर्व घडामोडी घडत असताना मात्र शहरातील काही पेट्रालपंपचालकांनी वाढलेल्या कराची संधी साधून वाढीव दराने पेट्रोल, डिझेल विक्री केल्याचे समजते.यासंदर्भात काही नागरिकांनी दैनिकांच्या कार्यालयात दरवाढ लागू झाल्याबाबत खात्री करून घेतली, तर काहींनी तक्रारदेखील केली. पेट्रोपंप चालक कोणतीही सबब ऐकून घेत नसल्याचे अनुभवदेखील वाहनधारकांनी बोलून दाखविले. पेट्रोलदरवाढ झाली किंवा नाही याबाबतची स्पष्टता कुठून मिळेल याविषयी अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. मात्र पंपचालकांकडून वाहनधारकांचे समाधान होऊ शकले नाही.केंद्र शासनाकडून अनेक उद्योग व्यवसायांना कर्ज आणि सवलती दिल्या जात असताना पेट्रोल-डिझेलवर कर आकारण्यात आल्याने ट्रान्सपोर्ट व्यावसायिक संकटात सापडला आहे. यामुळे महागाई वाढण्याची शक्यता आहे. शहरातील काही पंपचालकांनी आताच इंधन दरवाढ केली आहे. रोखीचे व्यवहार, अ‍ॅटो पार्ट, कस्टम ड्युटी, एक्साइज ड्युटी वाढविण्यात आल्यामुळे ट्रान्सपोर्ट व्यवसाय सर्वाधिक अडचणीत येऊ शकतो.- जयपाल शर्मा, अध्यक्ष, नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनअर्थसंकल्पात इंधनदरवाढ जाहीर होताच शहरात पेट्रोलपंपांवर दर वाढल्याचा अनुभव अनेकांना आला. तर दुपारनंतर इंधनावरील कराला स्थगिती मिळाल्याचीदेखील अफवा पसरली होती.

टॅग्स :Budget 2019अर्थसंकल्प 2019Petrol Pumpपेट्रोल पंप