शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ऐतिहासिक महासभा रद्द!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 00:38 IST

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात महापालिका अधिनियमानुसार अविश्वास प्रस्ताव दाखल करून काढण्यात आलेली विशेष महासभा अखेरीस शुक्रवारी (दि. ३१) रद्द करण्यात आल्याची घोषणा महापौर रंजना भानसी यांनी केली.

नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात महापालिका अधिनियमानुसार अविश्वास प्रस्ताव दाखल करून काढण्यात आलेली विशेष महासभा अखेरीस शुक्रवारी (दि. ३१) रद्द करण्यात आल्याची घोषणा महापौर रंजना भानसी यांनी केली. अधिनियमानुसार स्थायी समितीच्या सदस्यांच्या प्रस्तावानुसार सभा रद्द करण्यासाठी कायदेशीर तरतुदींची चिकित्सा करण्यासाठी खल सुरू होता, अखेरीस समितीच्या सदस्यांच्या सह्यांनिशी प्रस्ताव मागे घेण्यात आल्यानंतर महासभा रद्दची औपचारीकता पार पाडण्यात आली.  महाराष्टÑ महापालिका अधिनियमाअंतर्गत आयुक्तांवर अविश्वास ठराव दाखल करायचा असेल तर त्यासाठी स्थायी समितीच्या चार सदस्यांनी मागणी केली तर नगरसचिव महापौरांना पत्र देतात आणि महापौरांना महासभा बोलावावीच लागते असा नियम आहे. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलेल्या करवाढीच्या विरोधासाठी आयुक्तांवर अविश्वास ठराव आणण्याचे भाजपासह अन्य विरोधी पक्षांनी ठरवले. त्यावेळी स्थायी समितीच्या विशेषाधिकाराचा वापर करण्यात आला. परंतु चार नव्हे तर तब्बल चौदा सदस्यांच्या सह्या घेण्यात आल्या. त्यावर उपमहापौरांची देखील स्वाक्षरी घेण्यात आली होती.  गेल्या सोमवारी (दि. २७) यासंदर्भातील प्रस्ताव नगरसचिवांना देण्यात आला. त्यांनी महापौरांना तो सुपूर्द केला आणि त्यांनतर महापौरांनी शनिवारी (दि. १) महासभा बोलविली मात्र शुक्रवारी (दि. ३१)मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांनी महापौरांना दूरध्वनी करून अविश्वास ठरावाची प्रक्रिया रद्द करण्याचे आदेश दिले. त्यामुळे महापौरांनी तशी घोषणा केली परंतु प्रस्ताव मागे घ्यायचा म्हणजे नक्की काय करायचे याबाबत कायदेशीर पेच निर्माण झाला.महापालिकेच्या अधिनियमात स्थायी समितीच्या चार सदस्यांनी पत्र दिले तर विशेष महासभा बोलविण्याची तरतूद आहे. परंतु ती रद्द करण्याची तरतूद अधिनियमात नाही.त्यामुळे महासभा बोलवून ती रद्द करण्यासाठी महासभेत निर्णय घ्यावा की, अगोदरच सभा रद्द करावी असा पेच निर्माण झाला. त्यातही स्थायी समितीत एकुण १६ सदस्य असून त्यापैकी १५ जणांनी सह्या दिल्या होत्या.समितीत भाजपाच्या सदस्यांची संख्या नऊ आहे, विरोधी पक्षांनी किंवा कोणत्याही समिती सदस्याने आपण कायेदशीर प्रक्रिय करून नोटिस बजावली आहे. ती महासभा कशी काय रद्द झाली असे न्यायालयात आव्हान दिले तर त्याचे काय होऊ शकते याबाबतही बराच खल झाला. विशेष महासभा रद्द करण्याबाबत आयुक्तांचाही सल्ला घेण्यात आल्याचे समजते. अखेरीस समितीच्या सदस्यांकडून माघार पत्र घेण्याचे ठरवण्यात आले. त्यानुसार प्रस्ताव माघारीसाठी मोहिम राबविण्यात आल्यानंतर तीढा सुटला.अनेक कायदेशीर प्रश्नविशेष महासभा अशा पध्दतीने करता येते किंवा नाही याबाबत बराच खल झाला असला तरी अजूनही अनेक कायदेशीर प्रश्न उपस्थित असून प्रसंगी न्यायालयात दाद मागण्याची देखील तयारी असून त्यामुळे सभा रद्द होणे तितकेसे सोपे नसल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाtukaram mundheतुकाराम मुंढे