शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

४० तासांनंतर वैभव सोनवणेचा मृतदेह शोधण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 12:53 IST

विरगाव : दसाणा येथील लघुमध्यम प्रकल्पात बुडालेल्या वैभव संजय सोनवणे (रा. दसाणा, १९) या तरु णाचा मृतदेह तब्बल ४० तासानंतर बाहेर काढण्यात अखेर यंत्रणेला यश आले.

विरगाव : दसाणा येथील लघुमध्यम प्रकल्पात बुडालेल्या वैभव संजय सोनवणे (रा. दसाणा, १९) या तरु णाचा मृतदेह तब्बल ४० तासानंतर बाहेर काढण्यात अखेर यंत्रणेला यश आले. मंगळवारी सकाळी बॅकवॉटर क्षेत्रात वैभवचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आल्यानंतर तो पाणबुडी पथकाने बाहेर काढला. यानंतर अत्यंत शोकाकुल वातावरणात दुपारी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वैभव हा अविवाहित असून तो परिवारातील एकुलता एक मुलगा होता. रविवारी (१९) दुपारी चार वाजेच्या सुमारास मित्रांसमवेत दसाणा प्रकल्पात पोहण्यासाठी गेलेला वैभव सोनवणे हा तरु ण पाण्यात बुडल्यानंतर त्याच्या शोधासाठी गत दोन दिवसांपासून तालुका प्रशासनाकडून शोधकार्य हाती घेण्यात आले होते. गाव परिसर तसेच तालुक्यातील लोहोणेर येथील नामांकित पोहणाऱ्यांना दसाणा प्रकल्पात उतरवूनही मृतदेह हाती लागत नसल्याने सोमवारी सायंकाळी अखेर नाशिक महानगरपालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण पथकाला पाचारण करून मृतदेह शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र सुमारे चार तासांच्या अथक परिश्रमानंतरही देविदास चंद्रमोरे यांच्या नेतृत्वाखालील पाच कर्मचाºयांच्या पाणबुडी पथकाला मृतदेह शोधण्यात अपयश आल्यानंतर सोमवारी रात्री ही शोधमोहीम थांबविण्यात आली होती. मंगळवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास पुन्हा एकदा शोधमोहिमेसाठी हे पथक धरण परिसरात गेले असता यावेळी मृतदेह पाण्यावर तरंगताना त्यांना आढळून आला. त्यास या पथकाने बाहेर काढून गत दोन दिवसांपासून चालू असलेली शोधमोहीम अखेर थांबविली. यानंतर वैद्यकीय विभागाकडून जागेवरच शवविच्छेदन केले जाऊन त्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिक