गतिमान न्यायदानासाठी वकिलांनी पुढाकार घ्यावा: न्या. पी. बी. वराडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 01:34 AM2020-01-13T01:34:22+5:302020-01-13T01:34:50+5:30

न्यायदानाची प्रक्रि या अथांग सागरासारखी आहे. कायद्याचे नेमके सादरीकरण करीत वकिलांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत गतिमान न्यायदानासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी. बी. वराळे यांनी केले.

Advocates for speedy justice should take the initiative: justice. P. B. Varaday | गतिमान न्यायदानासाठी वकिलांनी पुढाकार घ्यावा: न्या. पी. बी. वराडे

निफाड येथे वकिलांना मार्गदर्शन करताना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी. बी. वराळे. समवेत निफाडचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. जी. वाघमारे, ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. प्रमोद जोशी, बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र आणि गोव्याचे अध्यक्ष अ‍ॅड. अविनाश भिडे, अमोल सावंत, जयंत जायभावे, नितीन ठाकरे, अंबादास आवारे आदी.

googlenewsNext
ठळक मुद्देनिफाडला कायदेविषयक मार्गदर्शन चर्चासत्र

लासलगाव : न्यायदानाची प्रक्रि या अथांग सागरासारखी आहे. कायद्याचे नेमके सादरीकरण करीत वकिलांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत गतिमान न्यायदानासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी. बी. वराळे यांनी केले.
निफाड न्यायालय आवारात रविवारी बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र आणि गोवा तसेच निफाड वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक अभ्यास कार्यक्र मांतर्गत मार्गदर्शन चर्चासत्राचा शुभारंभ न्यायमूर्ती वराळे यांच्या हस्ते झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी निफाडचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. जी. वाघमारे, न्या. एस. टी. डोके, न्या. पी.डी. दिग्रसकर, न्या. एस.बी. काळे, न्या. श्रीमती एम.एस. कोचर, न्या. प्राची गोसावी, ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. प्रमोद जोशी, बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र आणि गोवाचे अध्यक्ष अ‍ॅड. अविनाश भिडे, अ‍ॅड.अमोल सावंत, अ‍ॅड. अविनाश देशमुख, अ‍ॅड. जयंत जायभावे, अ‍ॅड. नितीन ठाकरे, निफाड वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. अंबादास आवारे यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आले. न्या. वराळे यांनी बोलताना, बार कौन्सिलच्या निरंतर विधि अभ्यास उपक्र माने विचारमंथन गतीने होत असून, त्याची गतिमान न्यायदानात मोलाची मदत होईल, असे स्पष्ट केले. वकिलांनी विधिज्ञ म्हणून अधिक परिपूर्ण असले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. वकिलांनी पक्षकारांना सर्वोत्तम देण्याचा कटाक्ष ठेवला तर न्यायदानात गतिमानता येईल, असेही ते म्हणाले. निफाड तालुक्यातील वकीलांची अभ्यासपूर्ण परंपरा असल्याचेही वराळे यांनी सांगितले.
याप्रसंगी न्या. श्वेता घोडके, न्या. रेणुका रहातेकर, अ‍ॅड. इंद्रभान रायते, अ‍ॅड. राहुल निरभवणे तसेच निफाड वकील संघाचे अध्यक्ष
अ‍ॅड. अंबादास आवारे यांचा सत्कार न्या. वराळे यांच्या हस्ते करण्यात आला. न्यायमूर्ती वराळे यांचा परिचय शरद नवले यांनी करून दिला. सूत्रसंचालन ए.के. भोसले यांनी केले. नितीन ठाकरे यांनी आभार मानले.
विलंब होत असल्याची पक्षकारांची तक्रार : अ‍ॅड़ भिडे
बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र आणि गोव्याचे अध्यक्ष अ‍ॅड. अविनाश भिडे यांनी न्यायदानास विलंब होतो ही पक्षकारांची तक्र ार असल्याचे सांगून न्यायदान गतीने व्हावे याकरिता वकिलांनी काम करण्याचे आवाहन केले.
मुंबईचे ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. प्रमोद जोशी यांनी कनिष्ठ न्यायालयात खटले चालताना पक्षकारांना नेमकी काय समस्या आहे ते समजावून घेऊन त्याचे निराकरण होण्यासाठी कोणत्या कायद्यानुसार खटला पुढे न्यावयाचा हे नेमकेपणाने मांडले पाहिजे, असे सांगितले.

Web Title: Advocates for speedy justice should take the initiative: justice. P. B. Varaday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.