शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

आदिवासी मुलींच्या वसतिगृहासाठी निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 01:16 IST

नामपूर रोडवरील गेल्या अनेक वर्षांपासून निधीअभावी रखडलेल्या ३२५ प्रवेश क्षमतेच्या आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहास सुमारे ९ कोटी रुपयांच्या निधीस आदिवासी विकास विभागाने नव्याने सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्याने सुसज्ज व अद्यावयत वसतिगृह निर्मितीचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी दिली.

सटाणा : येथील नामपूर रोडवरील गेल्या अनेक वर्षांपासून निधीअभावी रखडलेल्या ३२५ प्रवेश क्षमतेच्या आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहास सुमारे ९ कोटी रुपयांच्या निधीस आदिवासी विकास विभागाने नव्याने सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्याने सुसज्ज व अद्यावयत वसतिगृह निर्मितीचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी दिली.यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात आमदार चव्हाण यांनी म्हटले आहे की, येथील नामपूर रस्त्यावर उभारण्यात आलेल्या मुलींच्या शासकीय वसतिगृहाचे काम गेल्या चार वर्षांपासून निधीअभावी रखडले आहे. दरम्यान तत्कालीन आदिवासी आयुक्त नाशिक व कळवण विभागीय प्रकल्प अधिकारी यांच्या सूचनेनुसार कामात अनेक बदल सुचविण्यात आल्याने वसतिगृहाच्या बांधकाम खर्चात प्रचंड वाढ झाली. यामुळे शासनानेदेखील दुर्लक्ष केले. गेल्या ३ वर्षांपासून आपण सातत्याने शासनासह आदिवासी विकास विभागाच्या मंत्र्यांकडे विधानसभा अधिवेशन काळात तारांकित व औचित्याचा मुद्दा उपस्थित केला. तसेच आदिवासी विकास विभागाच्या पुरवणी मागणीवर चर्चा घडवून आणली, असे चव्हाण यांनी म्हटले आहे. परिणामी आदिवासी मुलींच्या वसतिगृहासाठी ३ कोटी ९० लाख ९२ हजार रुपये व २५० क्षमता असलेल्या वसतिगृहास सुमारे ४ कोटी ९८ लाख ५१ हजार रुपयांच्या अंदाजपत्रकास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

टॅग्स :GovernmentसरकारMLAआमदार