गावगाडा चालवतांना प्रशासकांची होणार दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 07:12 PM2020-09-12T19:12:51+5:302020-09-12T19:13:29+5:30

जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील ६४ ग्रामपंचायतीवर पंचायत समितीच्या विविध विभागातील विस्तार अधिकाऱ्यांच्या प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्त विस्तार अधिकाऱ्यांनी संबंधित ग्रामपंचायतीचा प्रशासक म्हणुन पदभार स्विकारला आहे, मात्र पंचायत समितीचे आपले विभागातील कामकाज सांभाळून ग्रामपंचायतीना भेटी देणे भौगोलिकदृष्ट्या दळणवळणासाठी अंतर आणि वेळेचा विचार करता दमछाक करणारे आहे.

Administrators will get tired while running the village | गावगाडा चालवतांना प्रशासकांची होणार दमछाक

गावगाडा चालवतांना प्रशासकांची होणार दमछाक

Next
ठळक मुद्देयेवला : ६४ ग्रामपंचायतीवर प्रशासक ; जबाबदारी वाढली

जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील ६४ ग्रामपंचायतीवर पंचायत समितीच्या विविध विभागातील विस्तार अधिकाऱ्यांच्या प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्त विस्तार अधिकाऱ्यांनी संबंधित ग्रामपंचायतीचा प्रशासक म्हणुन पदभार स्विकारला आहे, मात्र पंचायत समितीचे आपले विभागातील कामकाज सांभाळून ग्रामपंचायतीना भेटी देणे भौगोलिकदृष्ट्या दळणवळणासाठी अंतर आणि वेळेचा विचार करता दमछाक करणारे आहे.
येवला तालुक्यातील ६४ ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमले आहेत. त्यातच आता कोरोनाचा प्रादुर्भावही तालुक्यात वाढत चालला आहे, अनेक गावांत बाधित आढळत आहे. दिवसेंदिवस ही आकडेवारी वाढत चालली असून ती रोखण्याचे काम करत असतानाच गावकारभाºयांना आता पायउतार व्हावे लागले आहे. नेमलेल्या प्रशासकाकडे केवळ एकच ग्रामपंचायत नाही तर सात आठ ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळायचा आहे. याशिवाय पंचायत समितीत ज्या विभागात हे प्रशासक काम करत आहे तेही सांभाळून गावगाडा चालवायचा आहे.
एकूणच कामाचा अतिरिक्त ताण या प्रशासकांना देण्यात आल्यामुळे कोरोना काळात गावकारभार कसा पाहणार हे महत्वपूर्ण ठरणार आहे. तसेच एक गाव पुर्वेला तर दुसरे गाव पश्चिमेला त्यामुळे भौगोलिकदृष्ट्या दळण वळणामध्येच प्रशासकांचा जास्तीत जास्त वेळ जाणार आहे. कोरोनाच्या काळामध्ये ग्रामपंचायतीकडून राबविण्यात उपाय योजनांवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

एका प्रशासकीय अधिकारी यांच्याकडे सात-आठ ग्रामपंचायतीचा प्रशासकीय कार्यभार असल्याने त्यांना प्रत्येक गावाला एक दिवस जरी दिला तरी पंधरा दिवसांनी प्रशासक या गावात जाईल त्यामुळे जनतेची कामे वेळेत कशी होतील. नवीन प्रस्ताव दाखल करण्याचे धाडस प्रशासकीय अधिकारी घेणार नाही. त्यामुळे गावगाडा चालण्यास अडथळा निर्माण होतील.
- मनिषा लभडे, माजी सरपंच, ग्रामपंचायत निमगाव मढ, ता. येवला.

Web Title: Administrators will get tired while running the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.