शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
5
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
6
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
7
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
8
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
9
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
10
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
11
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
12
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
13
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
14
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
15
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
16
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
17
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
18
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
19
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
20
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!

‘..तोपर्यंत प्रशासक हटणार नाही’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 23:19 IST

सातपूर : सर्वसाधारण सभेतील ठरावांचा इतिवृत्तांत आणि पत्र व्यवहार रिझर्व्ह बँकेकडे करण्यात आला आहे. त्यामुळे जोपर्यंत रिझर्व्ह बँकेकडून काही निर्देश येत नाहीत तोपर्यंत प्रशासक हटणार नाही, अशी स्पष्टोक्ती नामको बँकेचे प्रशासक जे. बी. भोरिया यांनी दिली आहे.

ठळक मुद्देनामको प्रशासक भोरिया : आर्थिक वर्षाच्या अहवालाची दिली माहिती

सातपूर : सर्वसाधारण सभेतील ठरावांचा इतिवृत्तांत आणि पत्र व्यवहार रिझर्व्ह बँकेकडे करण्यात आला आहे. त्यामुळे जोपर्यंत रिझर्व्ह बँकेकडून काही निर्देश येत नाहीत तोपर्यंत प्रशासक हटणार नाही, अशी स्पष्टोक्ती नामको बँकेचे प्रशासक जे. बी. भोरिया यांनी दिली आहे.नामको बँकेच्या प्रशासकीय कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत आर्थिक वर्षाच्या अहवालाची माहिती देताना भोरिया यांनी प्रशासकीय काळातील बँकेचा चढता आलेख सादर करताना सांगितले की, संचालक मंडळाच्या कार्यकाळापेक्षा प्रशासकीय काळात म्हणजेच २०१३ नंतर आतापर्यंत सर्वाधिक नफा (३५ कोटी रु पयांपेक्षा अधिक नफा) बँकेला झालेला आहे. त्यामुळे सभासदांना १५ टक्के लाभांश आणि सेवकांना २० टक्के बोनस देण्याची तरतूद केली आहे. २०१३ साली अवघे ३६ कोटी रु पयांचे भागभांडवल आता ५० कोटी रु पयांवर पोहोचले आहे.२०० कर्मचाऱ्यांना खास प्रशिक्षणासाठी दिल्लीला पाठविण्यात आलेले आहे. त्यामुळे बँकेच्या कामकाजात सुसूत्रता येत आहे. मात्र प्रशासकीय काळात अनेक कारणांमुळे १०.५९ टक्के एनपीए वाढला असला तरी त्यास प्रशासक जबाबदार नाही. एनपीए कमी करण्यासाठी त्या त्या शाखेला उद्दिष्टे देण्यात आलेले आहेत. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना त्यांनी सांगितले की, प्रशासक हटविणे माझ्या मतावर नाही. मात्र सर्वसाधारण सभेतील ठरावांचा इतिवृत्तांत आणि पत्रव्यवहार रिझर्व्ह बँकेकडे करण्यात आला आहे. त्यामुळे जोपर्यंत रिझर्व्ह बँकेकडून काही निर्देश येत नाहीत तोपर्यंत प्रशासक हटणार नसल्याचे स्पष्ट केले.प्रशासक हटविण्याबाबत शहरात बैठका होत असल्याची माहिती आपल्याकडे नसल्याचेही त्यांनी सांगितले.कायदेशीर कारवाई होणारचबँकेचे कर्ज थकविणाºया भुजबळांच्या आर्मस्ट्राँग कंपनीला जप्तीची नोटीस बजावण्यात आली आहे. या मालमत्तेवर अजून कोणाचा बोजा आहे काय? याची खातरजमा करण्याचे काम सुरू आहे. लवकरच या मालमत्तेवर जप्तीची कारवाई केली जाणार आहे. थकबाकीदार कोणीही असो कायदेशीर कारवाई होणारच असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.नामको बँकेच्या सुरत आणि हैदराबाद शाखा सुस्थितीत नाहीत. त्या शाखा तोट्यात सुरू आहेत. परराज्यातील विशेषत: हैदराबाद शाखेत भाषेची मोठी अडचण निर्माण होत आहे. त्या शाखा बंद केल्यास मल्टिनॅशनल बँकेचा दर्जा रद्द होऊ शकतो.त्यामुळे परराज्यातील बँकेच्या शाखा बंद करता येत नसल्याचा खुलासा भोरिया यांनी केला आहे.