शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

पाणी सोडण्यासाठी प्रशासनाची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 01:57 IST

जायकवाडी धरणासाठी समन्यायी पाणीवाटप करण्याच्या दृष्टीने नाशिक जिल्ह्णातील गंगापूर, दारणा व पालखेड या धरणांतून सुमारे साडेतीन टीएमसी पाणी सोडण्याचे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे आदेश जिल्हा प्रशासन व जलसंपदा विभागाला मंगळवारी प्राप्त झाल्यानंतर पाटबंधारे अधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे.

नाशिक : जायकवाडी धरणासाठी समन्यायी पाणीवाटप करण्याच्या दृष्टीने नाशिक जिल्ह्णातील गंगापूर, दारणा व पालखेड या धरणांतून सुमारे साडेतीन टीएमसी पाणी सोडण्याचे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे आदेश जिल्हा प्रशासन व जलसंपदा विभागाला मंगळवारी प्राप्त झाल्यानंतर पाटबंधारे अधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे. एकीकडे राजकीय पक्षांनी दिलेले आंदोलनाचे इशारे व पाण्याच्या प्रश्नावर शेतकºयांच्या संतप्त भावना पाहता, पाणी सोडताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त करून पोलिसांना बंदोबस्तासाठी पत्र देण्यात आले आहे.नाशिक जिल्ह्णातून जायकवाडी धरणासाठी दोन वर्षांपूर्वी पाणी सोडल्यानंतर त्याचा सर्वपक्षीय तीव्र उद्रेक निर्माण झाला होता. ठिकठिकाणी शेतकºयांची आंदोलने करून जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या समक्ष गोंधळ घातल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली होती. अशा परिस्थितीत यंदा जिल्ह्णात ८३ टक्के पाऊस होऊन धरणात जेमतेम ७७ टक्के साठा आहे.  काही तालुक्यांमध्ये आत्तापासूनच टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, उन्हाळ्यात यापेक्षाही भयानक परिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळे जिल्ह्णातील धरणांतील पाणी जायकवाडीला सोडण्याचा मुद्दा चर्चेत येताच, खुद्द सत्ताधारी भाजपातूनच त्याची पहिली प्रतिक्रिया उमटली तर शिवसेना, राष्टÑवादी, कॉँग्रेस, मनसेने पाणी सोडण्याला कडाडून विरोध दर्शविला आहे.  शेतकरी संघटना, पाणीवापर संस्था, शेतकºयांनी पाणी सोडण्याच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याची  धमकी दिली आहे. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने  गंगापूर धरण समूहातून .६० टीएमसी, दारणा धरण समूहातून २.०४ टीएमसी व पालखेड समूहातून .६० टीएमसी पाणी येत्या ३१ आॅक्टोबरच्या आत पाणी सोडण्याचे आदेश दिले असल्यामुळे जिल्हा प्रशासन व पाटबंधारे खात्याची धावपळ सुरू झाली आहे.बुधवारी जिल्हाधिकाºयांनी पाटबंधारे खात्याच्या अधिकाºयांची बैठक घेऊन त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली तसेच पाणी सोडण्यापूर्वी व सोडल्यावर करावयाच्या उपाययोजनांवर यावेळी चर्चा करण्यात आली.वीजपुरवठा खंडितसध्या दिवाळी सणाचा हंगाम असून, पोलिसांवर बंदोबस्ताचा ताण आहे. अशा परिस्थितीत पाण्यावरून नागरिकांच्या भावनांचा विचार केल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन सणासुदीच्या दिवसात सरकारला ते परवडणारे नाही. त्यामुळे पाणी सोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त घ्यावा लागणार असल्याने तसे पत्र बुधवारी ग्रामीण पोलिसांना देण्यात आले. त्याचबरोबर नदीपात्रात असलेल्या बंधाºयांच्या फळ्या काढण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, काही ठिकाणच्या फळ्या काढण्यात आल्या आहेत. नदीवाटे वहन होणाºया या पाण्याची वाटेत चोरी रोखण्यासाठी नदीच्या दुतर्फा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे, त्याबाबतचे पत्र वीज कंपनीला देण्यात आले.

टॅग्स :gangapur damगंगापूर धरणMarathwadaमराठवाडाWaterपाणी