शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाचा नकार, महासभा तोंडघशी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 00:54 IST

महापालिकेची शिक्षण समिती स्थापन करण्यावरून नऊ की सोळा असा महासभेत वाद झाल्यानंतर प्रशासनाने लोकप्रतिनिधींच्या दबावाखातर प्रस्ताव मागे घेत असल्याचे जाहीर केले; मात्र आता प्रशासनाने नकार दिला असून, त्यामुळे महासभा तोंडघशी पडली आहे.

नाशिक : महापालिकेची शिक्षण समिती स्थापन करण्यावरून नऊ की सोळा असा महासभेत वाद झाल्यानंतर प्रशासनाने लोकप्रतिनिधींच्या दबावाखातर प्रस्ताव मागे घेत असल्याचे जाहीर केले; मात्र आता प्रशासनाने नकार दिला असून, त्यामुळे महासभा तोंडघशी पडली आहे. शासनाच्या पत्राच्या आधारे सदरचा प्रस्ताव महापौरांनीच सादर केला होता; मात्र आता त्यात माघार कशी घेणार? असा प्रश्न प्रशासनाने केला आहे.  महापालिकेत अनेक वर्षे शिक्षण मंडळ अस्तित्वात होते. हे स्वायत्त मंडळ असल्याने त्या अनुषंगाने आर्थिक व प्रशासकीय अधिकारदेखील मंडळाला होते; मात्र शिक्षण हक्क कायदा झाल्यानंतर दुहेरी नियंत्रण नको म्हणून कायद्याने शिक्षण मंडळ रद्द करण्यात आले. त्यानंतर शासनाने महापालिकेला शिक्षण समिती नियुक्त करण्याची परवानगी दिली आहे. तथापि, अन्य विषय समित्यांप्रमाणेच शिक्षण समितीची रचना आणि अधिकार असल्याने नऊ सदस्यांची शिक्षण समिती नियुक्त करण्याचा प्रस्ताव महासभेवर मांडण्यात आला होता; मात्र सदस्यांनी यापूर्वी शिक्षण मंडळ १६ सदस्यांचे होते. त्यानुसार समितीचे सदस्य १६ असावे यासाठी आग्रह असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे महासभेने यापूर्वीच सोळा सदस्यांची समिती असावी असा ठराव केला असून, यासंदर्भात न्यायालयात याचिका प्रलंबित आहे, असे नगरसेवकांनी महासभेत सांगितले. त्यामुळे शुक्रवारी (दि. २६) महासभेत प्रशासनाने प्रस्ताव माघारी घेऊन सुधारित प्रस्ताव सादर करावा, असे आदेश दिले. प्रशासनानेदेखील माघार घेण्याचे मान्य केलेच; परंतु तसे पत्र नगरसचिवांनी दाखल करून ते महासभेत सादर केल्याने वाद मिटला आणि समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव तहकूब करण्यात आला.महापालिकेच्या नगरसचिव विभागाच्या दफ्तरी तशी नोंद असताना आता मात्र प्रशासनाने घुमजाव केले असून, महासभेतील प्रशासनाची भूमिका दबावाखाली घेतली गेली. महासभेने परत प्रस्ताव मागविला तर नऊ सदस्य नियुक्तीचाच प्रस्ताव पुन्हा सादर केला जाईल, असे प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितले.ते तर शासनाचे आदेशमहापालिकेने २६ मे २०१७ रोजी झालेल्या महासभेत शिक्षण समितीऐवजी शिक्षण मंडळ स्थापन करण्यास मान्यता दिली असली तरी सदर ठरावानुसार शिक्षण मंडळास पूर्वी असलेले अधिकार प्राप्त होत नाहीत तरी महाराष्टÑातील अधिनियमातील तरतुदीनुसार महापालिकेने शिक्षण समिती स्थापन करणे अभिप्रेत असल्याने त्याप्रमाणे कार्यवाही करावी असे शासनाने याच वर्षी एप्रिल महिन्यात दिलेल्या आदेशात नमूद केले आहे. त्यामुळे महापालिकेने आग्रह करून उपयोग नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाtukaram mundheतुकाराम मुंढे