शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी झाले हायटेक; तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वाढल्या तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 00:21 IST

ग्रामीण पोलीस मुख्यालयात सुरू करण्यात आलेल्या सोशल मीडिया सेलच्या माध्यमातून दहा महिन्यांत २१९ पेक्षा अधिक तक्रारी सोशल मीडियावरून प्राप्त झाल्या असून, १७१ तक्रारींवर कारवाई करण्यात आली आहे.

आडगाव : ग्रामीण पोलीस मुख्यालयात सुरू करण्यात आलेल्या सोशल मीडिया सेलच्या माध्यमातून दहा महिन्यांत २१९ पेक्षा अधिक तक्रारी सोशल मीडियावरून प्राप्त झाल्या असून, १७१ तक्रारींवर कारवाई करण्यात आली आहे. पेठ, सुरगाणा, कळवण या आदिवासी भागांतून जास्तीत जास्त तक्रारी करण्यासाठी नागरिक सरसावत असल्याची माहिती प्राप्त झाली असून, ग्रामीण पोलिसांच्या सोशल मीडिया सेलकडे आदिवासी भागातून अधिकाधिक तक्रारी प्राप्त होत असून, कारवाई सुरू आहे. देशांत इंटरनेट व सोशल मीडियाचा वापर हा अत्यंत प्रभावीपणे सुरू असून, केंद्र आणि राज्य सरकारनेदेखील डिजिटल इंडियाचा नारा देत सर्व सरकारी कार्यालयांचा कारभार डिजिटल करण्यावर भर दिला आहे. ग्रामीण भागातदेखील सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याचमुळे ग्रामीण पोलीस मुख्यालयात नवनियुक्त पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी ग्रामीण पोलीस मुख्यालयाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर काही दिवसांत म्हणजेच ७ जुलै २०१७ रोजी सोशल मीडिया सेल सुरू केले. त्यामुळे जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात घडणाºया गुन्हेगारी घटनांच्या तक्र री नागरिक सोशल मीडियाच्या माध्यमातून करत आहे. यामध्ये अवैध धंधे, अवैध दारू विक्री, घरगुती व शेजायांचे वाद, फोनवर येणारे फेक कॉल्स आणि विशेष म्हणजे स्थानिक पोलीस स्टेशनला तक् ार देऊनही कारवाई होत नसल्याबाबतच्या तक्रारी करण्यासदेखील नागरिक या माध्यमातून पुढे सरसावत आहे.तक्र रींवरील कारवाईसाठी विशेष पथक सोशल मीडिया सेलकडे येणाºया तक्रारींच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाकडून कारवाई केली जात आहे. त्यामुळे स्थानिक पोलिसांकडून कोणतीही दखल न घेतल्या जाणाºया तक्र ारी सोशल मीडियावरून केल्या जात आहे. सोशल मीडियावर प्राप्त होणाºया तक्र ारींवर कारवाईसाठी विशेष पथकाची नेमणूक करून कारवाई होत आहे. पण यावरून स्थानिक पोलिसांच्या गलथान कारभाराचीदेखील यानिमित्ताने जाणीव होत असल्याने पोलीस कर्मचाºयांच्या तक्र ारीदेखील थेट अधीक्षकांपर्यंत करण्याचे व्यासपीठ सोशल मीडियामुळे प्राप्त झाले आहे.१७१ तक्रारींवर कारवाईजिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, कळवण या अतिदुर्गम आदिवासी भागासह मालेगाव, सिन्नर, नांदगाव या भागांतील नागरिक तक्र ारी करण्यास पुढाकार घेत आहे. आदिवासी भागातील पेठ, सुरगाणा, कळवण या भागातून अधिकाधिक तक्र ारी प्राप्त होत असल्यामुळे सोशल मीडियाचे आदिवासी भागातील महत्त्व खºया अर्थाने अधोरेखित होत आहे. सोशल मीडियावर प्राप्त होणाºया तक्र ारींवर स्वत: पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक यांचे लक्ष असते. सोशल मीडिया सेल कार्यान्वित होऊन जवळपास दहा महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटला असून २१९ पेक्षा अधिक तक्र ारी सोशल मीडियावरून प्राप्त झाल्या असून, १७१ तक्रारींवर कारवाई केली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

टॅग्स :PoliceपोलिसSocial Mediaसोशल मीडिया