शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांमध्ये जाऊन संवाद : आदित्य ठाकरे यांची ‘डिजिटल शाळा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 00:30 IST

आधुनिक शिक्षणपद्धतीकडे शालेय विद्यार्थ्यांचा कल वाढणे गरजेचे आहे. या दृष्टिकोनातून शिवसेनेच्या माध्यमातून युवासेना प्रयत्नशील आहे, असे सांगत युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी रावसाहेब थोरात सभागृहात ‘डिजिटल शाळा’ भरविली.

नाशिक : आधुनिक शिक्षणपद्धतीकडे शालेय विद्यार्थ्यांचा कल वाढणे गरजेचे आहे. या दृष्टिकोनातून शिवसेनेच्या माध्यमातून युवासेना प्रयत्नशील आहे, असे सांगत युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी रावसाहेब थोरात सभागृहात ‘डिजिटल शाळा’ भरविली.  निमित्त होते, पोलीस वसाहतीमधील मनपा शाळा क्रमांक १६मध्ये साकारलेल्या ‘व्हर्च्युअल क्लासरूम’च्या शुभारंभाचे! ठाकरे यांनी शाळेला बुधवारी (दि.२०) भेट देऊन क्लासरूमचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी येथील क्लासरूमसोबत जोडलेल्या अन्य महापालिकांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी खासदार हेमंत गोडसे, जिल्हाध्यक्ष विजय करंजकर, महानगरप्रमुख नगरसेवक अजय बोरस्ते, माजी महापौर विनायक पांडे आदी मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर शाळेच्या प्रांगणात जमलेल्या विद्यार्थ्यांसोबत ठाकरे यांनी हस्तांदोलन करत फोटोसेशन केले. येथील कर्मवीर दादासाहेच फोटो गॅलरीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. रावसाहेब थोरात सभागृहात मविप्रच्या विविध शाळांसह अन्य खासगी शाळांचे विद्यार्थ्यांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी ठाकरे यांनी सभागृहात हजेरी लावून विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना ई-मेल, ई-लर्निंग, टॅब, सोशल मीडिया आदींबाबत माहिती सांगितली. त्यानंतर आधुनिक शिक्षणपद्धतीला अनुसरून शिवसेनेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या संकेतस्थळाद्वारे आधुनिक शिक्षणपद्धतीविषयी ठाकरे यांनी विद्यार्थ्यांसोबत हितगुज केले. ई-लर्निंग शिक्षण प्रणाली, डिजिटल अभ्यासाचे फायदे समजावून दिले. या संकेतस्थळामार्फत विद्यार्थी मोफत स्मार्ट आधुनिक शिक्षणपद्धती समजून घेऊ शकतात. मुंबईमध्ये केलेल्या प्रयोगानंतर नाशिकमध्येही या दृष्टिकोनातून प्रयोग करण्याचे युवासेनेने ठरविले आहे, असे ठाकरे यावेळी म्हणाले. या संकेतस्थळामार्फत आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मोठी मदत होणार आहे. सेल्फी अन् फोटोसेशन आदित्य ठाकरे यांनी विद्यार्थ्यांसोबत सेल्फी व फ ोटोसेशनचा उत्साह दाखविला. थोरात सभागृहात व्यासपीठावरून त्यांनी विद्यार्थ्यांनी हाऊसफुल्ल झालेल्या सभागृहात सेल्फी घेतली. तसेच मनपा शाळेच्या प्रांगणात जमलेल्या विद्यार्थ्यांमध्ये जाऊन त्यांच्यासोबत फोटोसेशन केले.  यावेळी मात्र मुलांनी ठाकरे यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी गराडा घातल्यामुळे ढकलाढकली होण्याचाही धोका ओढावला होता; मात्र सुरक्षारक्षकांनी वेळीच अतीउत्साही विद्यार्थ्यांना आवरल्यामुळे अनुचित प्रकार टळला.विद्यार्थ्यांसोबत आधुनिक शिक्षण पद्धतीबाबत जागरूक करण्याचा प्रयत्न आहे. शिवसेनेच्या मोफत संकेतस्थळाद्वारे ई-लर्निंग अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना समजून घेता येणार आहे. यासाठी व्हर्च्युअल क्लासरूम’च्या माध्यमातून एक बुस्ट मिळणार आहे.- आदित्य ठाकरे, अध्यक्ष, युवासेना

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेSchoolशाळा