शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

आडगावला चिमुकलीवर तर शरणपुरोडला महिलेवर बलात्कार; एका संशयितास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 16:47 IST

चिमुकलीला त्रास होऊ लागल्यानंतर तिने घडलेला प्रकार आपल्या नातेवाइकांना सांगितल्यानंतर पीडितेच्या आईने पोलीस ठाण्यात धाव घेत लोदवालविरुध्द फिर्याद दिली.

ठळक मुद्देअत्याचार करून नखांनी दुखापतपतीला जीवे ठार मारण्याची धमकी देत अत्याचार

नाशिक : आडगाव पोलीस ठाणे हद्दीत एका चार वर्षीय चिमुरडीवर २८ वर्षीय युवकाने खाऊचे आमिष दाखवून शारीरिक लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

पीडितेच्या आईने याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित भगतसिंग मोतीलाल लोदवाल (रा.नांदुरनाका) याच्याविरुध्द बलात्कार, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमांतर्गत (पोस्को) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पीडीत चिमुकलीच्या घरी कोणीही नसल्याचा गैरफायदा घेत संशयित लोदवाल याने मागील आठवड्यात फिर्यादीचे घर गाठले. त्याने चिमुकलीला खाऊ देण्याच्या बहाण्याने घराबाहेर नेऊन तिच्यावर अत्याचार करून नखांनी दुखापत केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिमुकलीला त्रास होऊ लागल्यानंतर तिने घडलेला प्रकार आपल्या नातेवाइकांना सांगितल्यानंतर पीडितेच्या आईने पोलीस ठाण्यात धाव घेत लोदवालविरुध्द फिर्याद दिली. फिर्यादीनुसार पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला असून फरार संशयिताचा पोलीस शोध घेत आहेत. या गुन्ह्याचा तपास महिला उपनिरीक्षक चांदणी पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे.शरणपूर भागातील एका सार्वजनिक शौचालयात बळजबरीने घेऊन जात विवाहितेला त्याच्या पतीला जीवे ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर शारीरिक अत्याचार करत शरीरसंबंध ठेवल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पीडित विवाहितेने स्वत: सरकारवाडा पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार कथन केला असता पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून संशयित पॉली शांतवन जाधव (३०, रा. कॅनडा कॉर्नर) यास अटक केली आहे.एका सार्वजनिक शौचालयाशेजारील एका लहानशा खोलीत संशयित पॉली याने पीडित महिलेला १ जानेवारी २०१९पासून २० मार्च२०२१ या कालावधीदरम्यान, आत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. संशयिताने विवाहितेला तिच्या पतीला ठार मारण्याची धमकी दिली. यानंतर पीडितेवर बळजबरीने वेळोवेळी शरीरसंबंध ठेवले. याप्रकरणी पॉली यास पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पुढील तपास महिला उपनिरीक्षक प्रियंका गायकवाड या करीत आहेत.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयWomenमहिलाCrime Newsगुन्हेगारी