शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

शौचालयाचा खोटा दाखला जोडल्याने सरपंचपद गमावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 18:26 IST

धार्डे दिगर : अपर जिल्हाधिकाऱ्यांनी दिला निकाल

ठळक मुद्दे निवडणूक नामनिर्देशन पत्रासोबत शौचालय असल्याचा खोटा दाखला जोडल्याचे सिद्ध

कळवण : तालुक्यातील धार्डे दिगर ग्रामपंचायतीच्या सरपंच ललिता धनराज जाधव यांनी निवडणूक नामनिर्देशन पत्रासोबत शौचालय असल्याचा खोटा दाखला जोडल्याचे सिद्ध झाल्याने अपर जिल्हाधिकारी, मालेगाव यांनी ललिता जाधव यांचे ग्रामपंचायत सदस्य पद रद्द केले आहे. पर्यायाने त्यांनी सरपंचपदही गमावले आहे.पाडगण, मोहबारी, पिंपळे खुर्द, पाटीलपाडा, धार्डेदिगर अशी ग्रुप ग्रामपंचायत आहे. येथील सरपंच ललिता जाधव स्थनिक ठिकाणी न राहता कळवण येथे राहून मनमानी पद्धतीने कारभार करणे, अधिकाराचा गैरवापर करून शासकीय सेवेत असणारे सासरे फुलाजी रु पजी जाधव यांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळवून देणे तसेच ग्रामसेवकाशी संगनमत करून पाच लाखाची अफरातफर केल्याचा आरोप धार्डेदिगर येथील ग्रामस्थ दिपक सिताराम देशमुख यांनी अपर जिल्हाधिकारी मालेगाव यांच्याकडे केला होता. अपर जिल्हाधिकाऱ्यांनी दोनही पक्षाची बाजू एकूण घेत ग्रामपंचायत अधिनियम १९८५ चे कलम १६ नुसार सरपंच ललिता जाधव यांचे धार्डे दिगर येथील गावातील घरातील शौचालयाचा वापर करीत नसल्याचे सिद्ध झाल्याने त्यांचे ग्रामपंचायत सदस्यपद रद्द ठरविण्यात आले. अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणारपिंपळे खुर्द येथे एकत्र कुटुंब आहे. आमचे दोन शौचालय वापरात आहेत. अपर जिल्हाधिकाºयांनी शौचालय वापरात आहे किंवा नाही याची कुठचीही चौकशी न करता माझे विरोधात निकाल दिला आहे. मी या निर्णया विरोधात महसूल आयुक्त कार्यालय नाशिक यांचेकडे अपील दाखल केले आहे. येथील निर्णय लागल्यानंतर हेतुपुरस्कर बदनामी केल्याप्रकरणी मी संबंधितांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे.- ललिता जाधव, सरपंच, धार्डे दिगर

टॅग्स :Nashikनाशिकsarpanchसरपंच