शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कलेशी बालकांचे नाते जोडा :  सुरेखा बेंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 01:45 IST

आधुनिक तेच्या काळात मुले संगणक, स्मार्ट फोन यांच्या आहारी गेल्याचे चित्र आजूबाजूला पहावयास मिळत आहे. विविध गेम्सचे एकप्रकारे व्यसन लागल्यामुळे मुलांना त्यांच्या सुप्त कलागुणांची जाणीवदेखील होत नाही.

नाशिक : आधुनिक तेच्या काळात मुले संगणक, स्मार्ट फोन यांच्या आहारी गेल्याचे चित्र आजूबाजूला पहावयास मिळत आहे. विविध गेम्सचे एकप्रकारे व्यसन लागल्यामुळे मुलांना त्यांच्या सुप्त कलागुणांची जाणीवदेखील होत नाही. त्यामुळे कलागुणांना वाव मिळत नाही, पालकांनी त्याकडे लक्ष देत मुलांचे कलेशी जवळीक निर्माण करून देत मुलांचे नाते कलेशी जोडण्याचा प्रयत्न करायला हवा, असे मत ज्येष्ठ रंगकर्मी सुरेखा बेंद्रे यांनी व्यक्त केले.सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे परशुराम साईखेडकर नाट्यगृहात आयोजित सोळाव्या राज्य बालनाट्य स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी बेंद्रे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या. सोमवारी (दि.२१) स्पर्धेच्या प्रहिल्या चारदिवसीय फेरीचा प्रारंभ झाला. उद्घाटनप्रसंगी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम, श्रीकांत बेणी, परीक्षक प्रमोद काकड, जुई बर्वे, डॉ. स्वाती वेदक, समन्वयक राजेश जाधव, सहसमन्वयक मीना वाघ उपस्थित होते. यावेळी बेंद्रे म्हणाल्या, भावी पिढीमधील क लागुण ओळखून त्यांना त्याची जाणीव करून देत ते विकसित करण्यासाठी शालेय जीवनापासूनच प्रयत्न होणे गरजेचे आहे. यासाठी पालकांसह शिक्षकवर्गानेही ती जबाबदारी ओळखणे आवश्यक आहे.सोमवारी एकूण पाच नाटके सादर झाली. दीपक मंडळाने ‘कोणी मोडलं’ हे विनोदी नाटक सादर केले. गिरीश जुन्नरे लिखित व कुंतल गायधनी दिग्दर्शित या नाटकात स्वामिनी कुलकर्णी, स्वरा घोलप, श्रीहरी महाजन, शिवानी बेळे, ओम पाटील, गोमांत पंचाक्षरी, नितीन फुलंब्रीकर, प्रतीक शुक्ल आदींच्या भूमिका होत्या.श्रीमती रंगूबाई जुन्नरे हायस्कूलतर्फे ‘निर्धार’ हे नाटक सादर झाले.मनीषा नलगे लिखित व अनुराधा देशपांडे दिग्दर्शित या नाटकातून फास्ट फूडच्या दुष्परिणामांवर प्रकाश टाकण्यात आला. पार्थ महाजन, कौशल मुळे, कृष्णा भोकरे, तन्मय सानप, आदित्य बैरागी, कनिष्क जोशी, देव पटेल आदींच्या भूमिका होत्या.बालनाट्य आविष्काराने जिंकली मनेअभिरंग बाल कला संस्थेने ‘जेव्हा तायडी बदलते’ नाटक सादर केले. श्रीवर्धन शिखरे, श्रावणी शिखरे, प्रणम्य ढेरगे, अद्वैत दीक्षित आदींच्या भूमिका होत्या. शेवगावच्या बाळासाहेब भारदे विद्यालयाने ‘तुझ्या जागी मी असते तर..’ हे उमेश घेवरीकर दिग्दर्शित नाटक सादर के ले. येवल्याच्या आत्मा मालिक गुरु कुलने ‘हेचि दान देगा देवा’ हे नाटक सादर करून उपस्थितांची मने जिंकली. धनंजय आहिरे, ओमकार नागरे, किशोर गायकवाड, कार्तिक कापडी, ऊर्मिला भोंडवे आदींनी भूमिका केल्या.

टॅग्स :cultureसांस्कृतिकNashikनाशिक