आदर्श गाव संकल्प योजना गावांच्या आर्थिक विकासास प्रेरक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 12:57 AM2021-09-13T00:57:04+5:302021-09-13T00:57:46+5:30

राज्य शासनामार्फत आदर्श गाव संकल्पना व प्रकल्प कार्यक्रम राबविण्यात येत असून, राज्यामधून दरवर्षी प्रभावीपणे सप्तसूत्री कार्यक्रम राबविणाऱ्या आदर्श गावांची निवड या योजनेतून केली जाते. सप्तसूत्रीच्या माध्यमातून निवड होत असली तरी त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी पार पाडण्याची जीद्द प्रत्येक गावकऱ्याने उराशी बाळगावी, असे आवाहन राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादा भुसे यांनी केले.

Adarsh Gaon Sankalp Yojana inspires economic development of villages | आदर्श गाव संकल्प योजना गावांच्या आर्थिक विकासास प्रेरक

आदर्श गाव संकल्प योजना गावांच्या आर्थिक विकासास प्रेरक

Next
ठळक मुद्देदादा भुसे : खडकी येथे विशेष ग्रामसभेत प्रतिपादन

मालेगाव : राज्य शासनामार्फत आदर्श गाव संकल्पना व प्रकल्प कार्यक्रम राबविण्यात येत असून, राज्यामधून दरवर्षी प्रभावीपणे सप्तसूत्री कार्यक्रम राबविणाऱ्या आदर्श गावांची निवड या योजनेतून केली जाते. सप्तसूत्रीच्या माध्यमातून निवड होत असली तरी त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी पार पाडण्याची जीद्द प्रत्येक गावकऱ्याने उराशी बाळगावी, असे आवाहन राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादा भुसे यांनी केले.

तालुक्यातील खडकी येथे विशेष ग्रामसभा व गावफेरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री भुसे बोलत होते. याप्रसंगी आदर्शगाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, सरपंच आशा देवरे, उपसरपंच ज्योती देवरे, बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव, उपसभापती सुनील देवरे, पंचायत समिती सदस्य भिकन शेळके, अभय पाठक, कृषी उपसंचालक सुरेश भालेराव आदी उपस्थित होते.

खडकी गावाचा आदर्श घेऊन तालुक्यातील इतर गावेदेखील त्याचे अनुकरण करतील, असा विश्वास व्यक्त करताना भुसे म्हणाले, वारकरी संप्रदायाला मानणारा मोठा वर्ग या गावात असल्यामुळे नशामुक्तीसाठी पोषक वातावरण मिळणार आहे. खडकी गावात लोकसहभागातून यापूर्वीच अभ्यासिका व व्यायामशाळा साकारण्यात आली आहे. गावाच्या विकासासाठी अध्यात्माची जोड देण्यासोबतच भावी पिढीसाठी कायमस्वरूपी उपलब्ध होणाऱ्या सोयीसुविधांवरही भर देण्यात यावा. शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यातही या गावाचा चांगला सहभाग आहे. समाजाच्या सर्व घटकांना सोबत घेऊन गावाचा नक्कीच विकास होईल, असेही ते यावेळी म्हणाले.

इन्फो

नुकसानीच्या पंचनाम्यांचे आदेश

बोअरवेल, नसबंदी, तरुणांना रोजगार, महिलांसाठी रोजगाराच्या संधी, विद्यार्थ्यांसाठी क्रीडांगण, आरोग्य, शिक्षण, अभ्यासिका, पाणी अडविण्यापासून ते महिला बचतगटाच्या सक्षमीकरणापर्यंत ज्या काही मागण्या आहेत त्या विविध विभागांच्या योजनांच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा विश्वासही भुसे यांनी यावेळी व्यक्त केला. निसर्गाचा समतोल बिघडल्यामुळे राज्यभरात कुठे कमी तर कुठे अधिक स्वरुपात पर्जन्यवृष्टी होत आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या क्षेत्रावर महसूल व कृषी विभागाने विशेष लक्ष केंद्रीत करुन अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी यंत्रणेला दिल्या.

Web Title: Adarsh Gaon Sankalp Yojana inspires economic development of villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.