शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

कृषिपंप चोरणारी टोळी सक्रीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 16:44 IST

गोदाकाठी भीतीचे वातावरण : पोलिसांकडून दुर्लक्ष

ठळक मुद्देमहागडे कृषिपंप चोरीला जाण्याचे सत्र सरार्स सरू असून पोलीस प्रशासनाचे मात्र त्याकडे दुर्लक्ष होत आहे.

पिळकोस : कळवण तालुक्यातील पिळकोस येथील गिरणा काठ परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरींवरील कृषिपंप चोरणारी टोळी पुन्हा सक्र ीय झाली असून, महागडे कृषिपंप चोरीस जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या दहा वर्षापासून शेतकर्यांचे महागडे कृषिपंप चोरीला जाण्याचे सत्र सरार्स सरू असून पोलीस प्रशासनाचे मात्र त्याकडे दुर्लक्ष होत आहे.पिळकोस येथील मधुकर पंडित वाघ या शेतक-याचा दोन महिन्यापूर्वी तीस हजार रु पये खर्च करून घेतलेला पाच एच.पी .चा कृषिपंप चोरटयांनी चोरुन नेला. तर मागील वर्षी याच दिवसात सुरेश जाधव यांचाही कृषिपंप व इतर साहित्य चोरीला गेले होते. याशिवाय, २० ते ३० शेतक-यांचे साहित्यही चोरीस गेले आहे. मधुकर वाघ या शेतक-याची दोन ठिकाणी शेतजमीन आहे व विहीर असून ते मळ्यात राहतात. शुक्रवारी (दि.३) सकाळी शेतकरी वाघ यांचा मुलगा दत्तूहा गिरणा नदीत काठाकडे असलेल्या विहिरीवरील मोटार चालू करण्यासाठी गेला असता , त्यांना विहरीवरील कृषिपंप, केबल आणि इतर साहित्य चोरीला गेले असल्याचे लक्षात आल. या परिसरातून शेतातील विहारीमधून कृषिपंप चोरीला जाणे हे नित्याचे झाले असल्यामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. पोलीस प्रशासनाकडून मात्र दुर्लक्ष केले जात असल्याने शेतकरी बांधवांकडून संताप व्यक्त केला जात आहे . परिसरात सराईत गुन्हेगारांची टोळी पुन्हा सक्र ीय झाली असल्यामुळे मळ्यात राहणारे शेतकरी ,शेतमजूर ,पशुपालकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे . पोलिस यंत्रणेने रात्री खेडोपाडी गस्त वाढवावी अशी मागणी ग्रामीण भागातील नागरिकांकडून होत आहे .शेळ्यांचीही चोरीपिळकोस परिसरात आजवर मोठ्या प्रमाणावर कृषी पंप चोरीला गेले आहेत. एका कृषिपंपची किंमत तीस हजाराच्या पुढे आहे . पाच वर्षाच्या कालावधीत पिळकोस परिसरात शेकडो शेळ्या चोरीला गेल्या असून एका शेळीची किंमत दहा हजाराच्या आसपास आहे.त्यामुळे शेतकरी व पशुपालकांचे मोठे नुकसान होत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकtheftचोरी