शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
5
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
6
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
7
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
8
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
9
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
10
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
11
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
12
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
13
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
15
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
16
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
17
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
18
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
19
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
20
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू

जेलरोडला पूर्ववैमनस्यातून कार्यकर्त्याचा खून

By admin | Updated: January 21, 2017 00:42 IST

जेलरोडला पूर्ववैमनस्यातून कार्यकर्त्याचा खून

नाशिकरोड : जेलरोड त्रिवेणी पार्क येथे शुक्रवारी (दि़२०) रात्री मनसेतून शिवसेनेत दाखल झालेल्या सुरेंद्र ऊर्फ घाऱ्या शेजवळ या युवकाचा पूर्ववैमनस्यातून अज्ञात चार-पाच हल्लेखोरांनी तलवार व कोयत्याच्या साहाय्याने वार करून खून केला़ या घटनेमुळे परिसरात दहशत व तणावाचे वातावरण पसरले आहे़  जेलरोड कारागृहाजवळील कॅनॉलरोड भागात राहणारा सुरेंद्र ऊर्फ घाऱ्या शेजवळ (३६) याच्यावर नाशिकरोड व उपनगर पोलीस ठाण्यात खून, मारामाऱ्या आदि प्रकारचे गुन्हे दाखल आहेत़ २००७ मध्ये दिग्रसकर खूनप्रकरणी सुरेंद्र शेजवळवर खुनाचा गुन्हा दाखल होता़ गत महापालिका निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून त्याने जुना प्रभाग ३५ व नवीन प्रभाग १८ मधून उमेदवारीही केली होती़ नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत सुरेंद्रची आई शांताबाई हिनेदेखील मनसेकडून उमेदवारी केली होती़  गेल्या पाच-सहा दिवसांपूर्वीच आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेजवळ याने शिवसेनेत प्रवेश केला होता़  शुक्रवारी दिवसभर शिवसेनेच्या इतर इच्छुक उमेदवारांनी नवीन प्रभाग १८ मध्ये नागरिकांच्या घरोघरी जाऊन प्रचार केला होता़ रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास शेजवळ व त्यांचा मित्र विक्र म पोरजे हे दोघे अ‍ॅक्टिवा दुचाकी (एमएच १५, एफई ३२५२) वरून नगरसेवक अशोक सातभाई यांच्या कार्यालयाकडून जेलरोडमार्गे घरी जाण्यासाठी त्रिवेणी पार्ककडे वळाले़ यावेळी पाठीमागून आलेल्या अज्ञात इस्टीम कारने त्यांच्या अ‍ॅक्टिवाला पाठीमागून धडक दिली़ शेजवळ व पोरजे हे दोघेही खाली पडल्यानंतर हल्लेखोर गाडीतून उतरले व शेजवळ पळून जात असताना हल्लेखोरांनी त्यास गाठून तलवार व कोयत्याच्या साहाय्याने त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे वार केल्याने तो जागीच ठार झाला़ यानंतर हल्लेखोर फरार झाला़  या हल्ल्याचे वृत्त परिसरात पसरताच घटनास्थळी मोठा तणाव पसरला होता़ पोलिसांनी शेजवळ यास बिटको हॉस्पिटल व त्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल केले़ यावेळी बिटको व जिल्हा रुग्णालयात मोठा जमाव जमला होता़ रात्री उशिरापर्यंत वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी माहिती व संशयितांचा शोध घेण्यासाठी तळ ठोकून होते़ (प्रतिनिधी)खुनाच्या घटनेनंतर मृतदेह शवविच्छेदना साठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला़ यावेळी नातेवाइकांनी जिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी केली होती़ दरम्यान, जिल्हा रुग्णालयात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़