शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगारांना मदत करणाऱ्यांवर कारवाई

By admin | Updated: August 6, 2016 01:07 IST

मोक्कान्वये कारवाई : पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन

पंचवटी : परिसरात दहशत निर्माण करणे, तसेच विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारांवर पोलिसांनी मोक्का अन्वये कारवाई केली असून, मोक्कातील गुन्हेगारांना मदत करणाऱ्यांची माहिती घेण्यात येत असून, त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. मोक्कान्वये कारवाई केलेल्या गुन्हेगारांबाबत कोणाला काही तक्रार करायची असल्यास त्यांनी पोलिसांना माहिती कळवावी, असे आवाहन सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार चव्हाण यांनी केले आहे. खून, खुनाचा प्रयत्न, गावठी कट्टा बाळगणे, दंगल घडवून आणणे आदि गुन्ह्यात सहभाग तसेच हनुमानवाडीतील वाघ बंधूंवर जीवघेणा हल्ला चढवून सुनील वाघ याची हत्त्या घडवून आणल्याप्रकरणी पोलिसांनी जवळपास २१ संशयितांवर मोक्का लावला आहे. त्यात तीन विधिसंघर्षित बालकांचा समावेश आहे. मोक्कान्वये पोलिसांनी परदेशी टोळीचा सूत्रधार कुंदन परदेशी, अजय जेठा बोरीसा, अक्षय इंगळे, करन परदेशी, आकाश जाधव, मयूर कानडे, मयूर भावसार, श्रीनिवास कानडे आदि संशयितांना अटक केली होती, तर मोक्कातील आरोपींना सर्वच प्रकारची मदत केल्याच्या कारणावरून अजय बागुल याला ताब्यात घेऊन त्याच्यावरही मोक्का लावण्यात आला होता. मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारांबाबत कोणाला तक्रार करायची असल्यास त्यांनी म्हसरूळ येथील सहायक पोलीस आयुक्त कार्यालयात संपर्क साधावा किंवा प्रत्यक्ष येऊन भेटावे, असे आवाहन सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार चव्हाण यांनी एका पत्रकान्वये केले आहे. मोक्कातील आरोपींबाबत तक्रार करणाऱ्यांची माहिती देणाऱ्यांची नावे गोपनीय ठेवली जाणार आहेत. (वार्ताहर)