शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

अशोकस्तंभावर दुचाकीस्वारांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 00:54 IST

स्मार्ट रोडमुळे नागरिकांना होणारा त्रास तर टळत नाहीच, परंतु वाहतूक पोलिसांकडून या भागात दुुचाकी उभी केली की टोइंग करणारे वाहन उचलून घेते. मात्र याच ठिकाणी अस्ताव्यस्त स्वरूपात असलेल्या रिक्षाचालकांवर आणि अन्य मोठ्या वाहनांवर कारवाई का केली जात नाही, हे मात्र आश्चर्यकारकच आहे.

नाशिक : स्मार्ट रोडमुळे नागरिकांना होणारा त्रास तर टळत नाहीच, परंतु वाहतूक पोलिसांकडून या भागात दुुचाकी उभी केली की टोइंग करणारे वाहन उचलून घेते. मात्र याच ठिकाणी अस्ताव्यस्त स्वरूपात असलेल्या रिक्षाचालकांवर आणि अन्य मोठ्या वाहनांवर कारवाई का केली जात नाही, हे मात्र आश्चर्यकारकच आहे.शहर स्मार्ट करण्याच्या नावाखाली महापालिकेच्या नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमी कंपनीने अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका दरम्यानचे हाती घेतलेले काम वर्र्ष-दीड वर्षापासून सुरूच आहे. हे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. या भागात दुकाने आणि शाळा आहेच, परंतु त्याचबरोबर हे रहिवासी क्षेत्रदेखील आहे, परंतु या नागरिकांना काय अडचणी येऊ शकतात हेदेखील समजून नियोजन केलेले नाही. गेल्या दीड ते दोन वर्षांपासून हा रस्ता घोळात आहे. परंतु त्यावर शहरातील नेते आणि राजकीय पक्ष आवाज उठवत नाहीत. या भागातील रस्त्यावरील दुकानात जायचे असेल तर लोकांना दुचाकी कोठे उभ्या करायच्या असा प्रश्न निर्माण होतो. येथील एखाद्या दुकानात जाण्यासाठी दोन मिनिटे गाडी उभी केली की टोइंग करणारी गाडी येते आणि गाडी घेऊन जाते. संबंधितांना विनंती करून दंड भरण्याची तयारी दर्शविली तरी गाडी सोडली जात नाही. इतकी वाहतूक शिस्त दाखवली जाते आणि दुसरीकडे मात्र याच ठिकाणी रिक्षा आणि अन्य मोठी प्रवासी वाहने अस्ताव्यस्त उभी असतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळाही होत असतो. परंतु त्यांच्यावर मात्र कोणीही कारवाई करीत नाही. मुळात हा त्रास दूर करण्यासाठी एक तर रस्ता कसा पूर्ण होईल यासाठी पाठपुरावा करणे गरजेचे आहे. परंतु अनेक महापालिका आयुक्त येऊन गेले तरी रस्ता कधी पूर्ण होईल हे कोणीच सांगू शकत नाही, हा विचित्र प्रकार आहे.किमान परिस्थितीचा तरी विचार करावावर्ष-दीड वर्षापासून स्मार्ट रोडचा विषय गाजत आहे, परंतु हे काम रखडले आहे. त्यामुळे नागरिकांना कुठेही वाहने उभी करावी लागतात. किमान त्याचा विचार करून तरी वाहतूक पोलिसांनी कारवाई करावी किंवा नाही याचा विचार करावा.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस