शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

वॉरंट रद्द असतानाही अटकेची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 17:05 IST

शिवडीच्या शेतकऱ्याला असाही पोलीसी खाक्या

ठळक मुद्देबाबाजी क्षीरसागर यांनी वॉरंट रद्द केल्याची माहिती देऊनही पोलिसी खाक्यापुढे त्यांचे काही चालले नाही

लासलगाव : न्यायालयाने अजामिनपात्र अटक वॉरंटचा आदेश रद्द करुनही निफाडच्या पोलिसांनी शिवडी येथील शेतक-याला अटक करत त्याला पोलिसी खाक्या दाखविला. पोलिसांच्या या अजब कृतीमुळे संबंधित शेतक-याला मात्र नाहक मनस्ताप भोगावी लागला आहे तर निफाड पोलिसांच्या एकूणच कामगिरीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.याबाबतची माहिती अशी की, निफाड न्यायालयात मोटार वाहन अपघात खटल्यात गैरहजर राहिल्याने बाबाजी बबन क्षीरसागर या शेतकऱ्यांविरूद्ध न्यायालयाने अजामिनपात्र अटक वॉरंट काढले होते मात्र आईच्या प्रकृतीच्या कारणास्तव न्यायालयात हजर राहता आले नसल्याने सदरचे वॉरंट रद्द करणेसाठी त्यांनी न्यायालयास विनंती केली होती. त्यानुसार, न्यायालयाने बाबाजी क्षीरसागर यांचे अटक वॉरंट दि. १० मे रोजी शंभर रु पयांचा दंड आकारत रद्द करण्याचा आदेश केला. सदर दंड भरल्याची पावती क्षीरसागर यांनी निफाड पोलिसांनाही दिली होती. तरीही दि. १३ जून रोजी निफाड पोलिसांनी बाबाजी क्षीरसागर यांना न्यायालयाचे अटक वॉरंट असल्याचे सांगत अटकेची कारवाई केली. याबाबत बाबाजी क्षीरसागर यांनी वॉरंट रद्द केल्याची माहिती देऊनही पोलिसी खाक्यापुढे त्यांचे काही चालले नाही. पोलिसांनी त्यांना अटक करु न न्यायालयात हजर केले असता अटक वॉरंटच रद्द असल्याची बाब समोर आली. त्यानंतर पुन्हा बाबजी क्षीरसागर यांना न्यायालयात अर्ज देऊन जामीनावर स्वत:ची सुटका करु न घ्यावी लागली. मात्र या कालावधीत बाबाजी क्षीरसागर यांना अटक करु न पोलिस कारवाई केल्याने विनाकारण मनस्ताप सहन करावा लागला. निफाड पोलिसांच्या या कामगिरीबद्दल मात्र चर्चेला उधाण आले आहे.

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिस