शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा धडाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 01:16 IST

कर्तव्यात कसूर करण्यासोबतच कामात अनियमितता आणि विनापरवानगी गैरहजर राहणे आदी विविध बाबतीत दोषी आढळून आलेल्या जिल्हा परिषदेच्या कर्मचाºयांवर प्रशासकीय कारवाई करण्याचा धडाका सुरूच असून, लाडची येथील ग्रामसेवकावर अनधिकृत रजेवर राहण्याच्या कारणावरून सक्तीने सेवानिवृत्तीसह सुरगाणा तालुक्यातील प्राथमिक शिक्षकास सेवेतून बडतर्फ करण्याची नोटीस बजावण्यात आली

नाशिक : कर्तव्यात कसूर करण्यासोबतच कामात अनियमितता आणि विनापरवानगी गैरहजरराहणे आदी विविध बाबतीत दोषी आढळून आलेल्या जिल्हा परिषदेच्या कर्मचाºयांवर प्रशासकीय कारवाई करण्याचा धडाका सुरूच असून, लाडची येथील ग्रामसेवकावर अनधिकृत रजेवर राहण्याच्या कारणावरून सक्तीने सेवानिवृत्तीसह सुरगाणा तालुक्यातील प्राथमिक शिक्षकास सेवेतून बडतर्फ करण्याची नोटीस बजावण्यात आलीआहे.  तसेच इगतपुरीतील एका शिक्षकाची वेतनवाढ कायमस्वरूपी रोखण्यासह अन्य दोन कर्मचाºयांना खातेचौकशीच्या नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या प्रशासन विभागाने शुक्रवारी दिली.त्र्यंबक व नाशिक तालुक्याच्या आढावा बैठकीत आठ कर्मचाºयांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्यानंतर नाशिक तालुक्यातील लाडची ग्रामपंचायतीत कार्यरत असलेले तत्कालीन ग्रामसेवक मोठाभाऊ भामरे यांच्यावर अनधिकृत रजेवर राहणे, ग्रामपंचायतीच्या सभांचे इतिवृत्त न लिहिणे, त्यांना बजावण्यात आलेल्या नोटिसांना अर्वाच्य व अशासकीय स्वरूपात खुलासा सादर करणे याबाबत विभागीय खातेनिहाय चौकशी प्रस्तावित करण्यात आली होती. त्यात ते दोषी आढळून आल्याने जिल्हा परिषद सेवा (शिस्त व अपील) नियमानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी त्यांना सक्तीने सेवानिवृत्त करण्याचे आदेश दिले आहेत. तर घोटी येथील उर्दू शाळेतील शिक्षक मोहम्मद इरफान मुख्तार अहमद यांना अनधिकृत गैरहजर राहणे, विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान करण्यासाठी दोषी आढळल्याने त्यांची एक वेतनवाढ कायमस्वरूपी रोखण्यात आली आहे. सुरगाणा येथील कहानडोळपाडा शाळेतील शिक्षक मनोहर गायकवाड यांनाही सेवेतून बडतर्फ करण्याबाबत अंतिम कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. कळवण तालुक्यातील धार्डेदिगर येथील ग्रामसेवक सुनील यादव, सुरगाणा तालुक्यातील शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी मंदोदरी पाटील यांना खातेचौकशीची नोटीस बजाविण्यात आली आहे.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदsuspensionनिलंबन