शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक महापालिकेकडून रस्त्यांवरील भाजी विक्रेत्यांविरुद्ध कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 19:35 IST

आयुक्तांचे आदेश : सातपूरमध्ये मोहीम, ७ ट्रक माल जप्त

ठळक मुद्देप्रस्तावित हॉकर्स झोनला फेरीवाला संघटनांनी विरोधही दर्शविला आहेभाजीमंडई तसेच विक्रेत्यांना नेमून दिलेल्या जागांवरच भाजीविक्रेत्यांनी व्यवसाय करावा, अन्यथा त्यांच्याविरूद्ध कठोर पावले उचलत अतिक्रमण विरोधी मोहीम

नाशिक - महापालिकेने हॉकर्स झोनचा आराखडा तयार केला असून त्यानुसार त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले असून रस्त्यावर भाजीविक्रेत्यांविरुद्ध मोहीम राबविण्याच्याही सूचना अतिक्रमण विभागाला देण्यात आल्या आहेत. या आदेशानंतर, गुरुवारी (दि.१५) सातपूर येथील  छत्रपती शिवाजी भाजी मंडई तसेच मंडई पार्कींगमध्ये अनधिकृतपणे व्यवसाय करणा-या भाजी विक्रेत्यांचे अतिक्रमण महापालिकेच्या पथकाने हटवले. यावेळी, पथकाने विक्रेत्यांकडून सुमारे ७ ट्रक विविध प्रकारचे साहित्य जप्त केले.महापालिकेने हॉकर्स झोन निश्चित करत त्याची काही विभागात अंमलबजावणीही सुरू केली आहे. परंतु, विक्रेत्यांकडून त्यास प्रतिसाद मिळत नसल्याने अंमलबजावणीत अडथळे उत्पन्न होत आहेत. याशिवाय, प्रस्तावित हॉकर्स झोनला फेरीवाला संघटनांनी विरोधही दर्शविला आहे. दरम्यान, महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे तुकाराम मुंढे यांनी स्वीकारल्यानंतर हॉकर्स झोनच्या आराखड्याची माहिती घेतली. त्यानंतर, हॉकर्स झोननुसार कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित अधिका-यांना दिले. याशिवाय, यापुढे भाजीमंडई तसेच विक्रेत्यांना नेमून दिलेल्या जागांवरच भाजीविक्रेत्यांनी व्यवसाय करावा, अन्यथा त्यांच्याविरूद्ध कठोर पावले उचलत अतिक्रमण विरोधी मोहीम राबविण्याचेही आदेश आयुक्तांनी दिले. त्यानुसार, गुरूवारी (दि.१५) अतिक्रमण विभागाने सातपूर विभागातील छत्रपती शिवाजी भाजी मंडई, तसेच शिवाजी मंडई पार्कींग मधील विक्रेत्यांना हटविण्याची कारवाई केली तसेच सातपूर कमानी पासून ते मारुती मंदिरापावेतो रस्त्यावर व रस्त्यालगत अतिक्रमणे करुन बसणारे भाजीविक्रते, फळविक्रते व इतर तत्सम व्यावसायिक यांना हटविले. यावेळी पथकाने आक्रमक भूमिका घेत भाजीपाला, फळभाज्यांसह विक्रेत्यांचे साहित्य जप्त करण्याची कारवाई केली.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका