शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

‘हेल्मेट ड्राइव्ह’मध्ये ७४२ दुचाकीचालकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 00:22 IST

हेल्मेट बाळगणारे मात्र वाहन चालवितांना डोक्यावर परिधान न करणारे तसेच हेल्मेटचा वापर न करणाºया शहरातील तब्बल ७४२ दुचाकीचालकांवर शहर वाहतूक पोलिसांनी मंगळवारी (दि़२३) स्पेशल हेल्मेट ड्राइव्हद्वारे कारवाई करून ३ लाख ७१ हजार रुपयांचा दंड वसूल केला़ केवळ हेल्मेटच नाही, तर चारचाकी चालविताना सीटबेल्ट न लावणाºया व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया ९५९ वाहनधानकांवर कारवाई करून एक लाख ९१ हजार ८०० रुपयांची दंडवसुली करण्यात आली़ वाहतूक पोलिसांच्या या कारवाईचा अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींना आर्थिक फटका बसला़

नाशिक : हेल्मेट बाळगणारे मात्र वाहन चालवितांना डोक्यावर परिधान न करणारे तसेच हेल्मेटचा वापर न करणाºया शहरातील तब्बल ७४२ दुचाकीचालकांवर शहर वाहतूक पोलिसांनी मंगळवारी (दि़२३) स्पेशल हेल्मेट ड्राइव्हद्वारे कारवाई करून ३ लाख ७१ हजार रुपयांचा दंड वसूल केला़ केवळ हेल्मेटच नाही, तर चारचाकी चालविताना सीटबेल्ट न लावणाºया व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया ९५९ वाहनधानकांवर कारवाई करून एक लाख ९१ हजार ८०० रुपयांची दंडवसुली करण्यात आली़ वाहतूक पोलिसांच्या या कारवाईचा अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींना आर्थिक फटका बसला़  पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनी गत दोन वर्षांपासून शहरात दुचाकी चालविताना हेल्मेट, तर चारचाकी चालविताना सीटबेल्ट वापरणे अनिवार्य केले़ यासाठी सर्वप्रथम प्रबोधन करून सरकारी कार्यालयात पत्रेही पाठविली व त्यानंतर दंडात्मक कारवाईला सुरुवात केली़ यानंतर शहरातील बहुतांशी वाहनचालकांकडून हेल्मेटचा वापर सुरू झाला असला तरी अजूनही बहुतांशी वाहनचालकांनी याकडे कानाडोळा केला आहे़ या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी मंगळवारी संपूर्ण शहरात हेल्मेट ड्राइव्ह राबविला़ यामध्ये शहरातील प्रमुख रस्ते, चौकांमध्ये नाकाबंदी करून दुचाकी व चारचाकी वाहनांची तपासणी करण्यात आली़  पोलिसांनी केलेल्या या तपासणीत बहुतांशी दुचाकीचालक कारवाई टाळण्यासाठी हेल्मेट दुचाकीला लटकवून ठेवतात वा जवळ बाळगतात, मात्र डोक्यावर परिधान करीत नसल्याचे दिसून आले़ तसेच बहुतांशी चारचाकीचालक हे सीटबेल्टचा वापर करीत नसल्याचे समोर आले़  संपूर्ण शहरात करण्यात आलेल्या कारवाईत हेल्मेट, सीटबेल्ट व बेशिस्त अशा एक हजार ७०१ वाहनचालकांवर केसेस करून पाच लाख ६२ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला़ विशेष म्हणजे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून दंडवसुली केल्यानंतर प्राचार्यांना बोलावून वाहतूक  नियमांचे धडेही पोलिसांकडून देण्यात आले़ वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करून कारवाई टाळावी, असे आवाहन पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी केले आहे़ महाविद्यालय फीचे पैसे दंडासाठीएचपीटी महाविद्यालयाजवळ हेल्मेट परिधान न करणाºया विद्यार्थिनीस अडवून पोलिसांनी पाचशे रुपये दंडाची पावती फाडली़ तिच्याकडे महाविद्यालयाच्या फीसाठीचे केवळ पाचशे रुपये होते. त्यामुळे तिने रडण्यास सुरुवात केली़ असे असतानाही तिने दंडाचे पैसे चुकते केले आणि टोर्इंगवाल्यांनी तिचे वाहन उचलले यामुळे तिला मैत्रिणींकडून पैसे घ्यावे लागले, अशाप्रकारे तिला दुहेरी आर्थिक फटका बसला़मुलीला शाळेत पायी सोडा...शालिमार परिसरातून मुलीला शाळेत सोडण्यासाठी जात असलेल्या दुचाकीस्वारास वाहतूक पोलिसांनी अडविले़ त्याने शाळेत सोडण्यासाठी जात असल्याचे सांगताच तुम्ही पायी जा, असा सल्ला देण्यात आला़ अखेर स्वत:जवळील पॅनकार्ड पोलिसांकडे दिल्यानंतर वाहनचालकास मुलीला शाळेत सोडण्यासाठी जाऊ देण्यात आले़

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय