शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
4
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
5
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
6
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
7
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
8
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
9
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
10
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
11
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
12
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
13
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
14
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
15
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
16
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
18
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
19
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
20
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी

‘त्या’ आरोपीच्या वडिलांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 01:29 IST

कॉँग्रेस प्रदेश प्रवक्ता व नगरसेविका हेमलता पाटील यांच्या बंगल्यात नोकर म्हणून मागील सहा ते सात वर्षांपासून कार्यरत असलेले श्रीपत ऊर्फ बंडू तुकाराम म्हस्के (५२, रा. कामटवाडे, वावरेनगर) यांनी विषारी औषध सेवन करून भगूर बसस्थानकावर आत्महत्या केल्याची घटना घडली.

ठळक मुद्देसोने चोरी प्रकरण : भगूर बसस्थानकावर घटना

नाशिक : कॉँग्रेस प्रदेश प्रवक्ता व नगरसेविका हेमलता पाटील यांच्या बंगल्यात नोकर म्हणून मागील सहा ते सात वर्षांपासून कार्यरत असलेले श्रीपत ऊर्फ बंडू तुकाराम म्हस्के (५२, रा. कामटवाडे, वावरेनगर) यांनी विषारी औषध सेवन करून भगूर बसस्थानकावर आत्महत्या केल्याची घटना घडली.टिळकवाडी येथील पाटील यांच्या बंगल्यावर म्हस्के नोकरदार म्हणून मोलमजुरी करत होते. महिनाभरापूर्वी त्यांच्या धाकट्या अल्पवयीन मुलाने सोन्याची बिस्किटे व दहा हजारांची रोकड चोरी करून पोबारा केल्याचे बुधवारी उघडकीस आले. ही बाब म्हस्के यांना सहन झाली नसावी व त्यामुळे आलेल्या तणावाने त्यांनी असे पाऊल उचलले असावे, असा अंदाज त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी व्यक्त केला आहे. म्हस्के यांच्या मृत्यूने कुटुंबावर मोठा आघात झाला असून, कुटुंबाचा आधार हरपला आहे. त्यांच्या मृतदेहावर बुधवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.पोलिसांनी त्यांना देवळालीच्या छावनी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले, मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी तपासून घोषित केले. त्यांचे जावई अनिल गंगाधर हतांगळे यांनी त्यांची ओळख पटविली. मयत म्हस्के यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, जावई, भाऊ असा परिवार आहे.म्हस्के हे बुधवारी भगूर बसस्थानक परिसरात अचानकपणे निघून गेले. त्यांनी तेथे विषारी औषध सेवन केले. सदर प्रकार नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ भगूर पोलीस चौकीमधील कर्मचाऱ्यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयSuicideआत्महत्या