शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
3
UPI व्यवहारांच्या नियमामध्ये होणार बदल, ८ ऑक्टोबरपासून अशा प्रकारे करू शकाल पेमेंट
4
पाकिस्तानातील सोने-चांदीचे दर वाचून विश्वास नाही बसणार! काय आहे एका तोळ्याची किंमत?
5
भर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न, CJI भूषण गवई यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
6
Palmistry: तळ हाताच्या शुक्र पर्वतावर 'या' चिन्हाचे असणे म्हणजे राजयोगच; तुम्हीपण तपासून बघा!
7
सुपर बॉय! २ वर्षांच्या आदित्यने कॉम्पुटरला टाकलं मागे, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद
8
IAS Misha Singh : लय भारी! वडील शेतकरी, लेक IAS अधिकारी; LLB नंतर UPSC ची तयारी, केली दमदार कामगिरी
9
मराठा समाज अन् राज्य सरकारला मोठा दिलासा; 'त्या' GR ला अंतरिम स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार
10
काही महिने थांबा, पेट्रोल कारच्या किंमतीत EV कार मिळतील; नितीन गडकरींचा मोठा दावा...
11
Thane Crime: ठाण्यात व्हॉट्सअपद्वारे 'सेक्स रॅकेट'; थेट हॉटेलमध्ये पोहोचले पोलीस, दलाल महिलेस अटक
12
"मला सोडून देण्यामागे काहीतरी रहस्य..."; सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाचे सूचक विधान
13
घनदाट जंगलात शूट झालाय 'कांतारा: चाप्टर १', कुठे आहेत हे नयनरम्य लोकेशन्स?
14
VIDEO: मोदींना विचारलं "आंबा कसा खाता?" झाला ट्रोल, आता अक्षयचा फडणवीसांना प्रश्न, "तुम्ही संत्री कशी खाता?"
15
IND vs AUS : फिटनेसच ठिकये पण फॉर्मच काय? रोहित-विराटच्या सिलेक्शनवर प्रश्नचिन्ह
16
२ तप सत्तेत, २४ वर्षांत काय-काय झाले? नरेंद्र मोदींनी सांगितली CM ते PM प्रवासाची Inside Story...
17
कफ सिरप मृत्यू प्रकरण : मृत मुलाच्या कबरीतून डॉक्टरचे 'ते' प्रिस्क्रिप्शन काढले बाहेर; आणखी एका बालकाची प्रकृती चिंताजनक
18
शिंदेंच्या हातून 'धनुष्यबाण' निसटणार?; अंतिम निकाल ठाकरेंच्या बाजूने लागणार, असीम सरोदेंचा दावा
19
छोटे व्हिडीओ पाहण्याची सवय जीवघेणी; मेंदूचं मोठं नुकसान, दारुच्या व्यसनापेक्षाही ५ पट धोका
20
"रात्री ३ वाजता उठवलं तरी मी उर्दू बोलतो...", सचिन पिळगावकरांचं नवं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?

अपमानास्पद वागणुकीविरोधात खातेप्रमुख एकवटले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:24 IST

अपमानास्पद वागणुकीविरोधात खातेप्रमुख एकवटले?विभागीय आयुक्तांकडे तक्रार करण्याची तयारी

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्हा परिषदेत बदलून आलेले मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांच्या विरोधात जिल्हा परिषद पदाधिकारी आणि सदस्य असतानाच आता पदोपदी अपमानास्पद वागणूक देत असल्याचे कारण देत सर्व खातेप्रमुख एकत्र आल्याची चर्चा आहे. येत्या एक-दोन दिवसात विभागीय आयुक्त महेश झगडे यांच्याकडेच थेट याबाबत सर्व खातेप्रमुख एकत्र येऊन तक्रार करणार असल्याचे समजते.गेल्या दोन महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेत बदलून आलेले मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांनी आल्या आल्याच कर्मचारी व अधिकाऱ्यांवर शिस्तीचा बडगा उगारला होता. गळ्यात ओळखपत्र असणे बंधनकारक करण्याबरोबरच वेळेत कार्यालयीन कामकाज करावे, तसेच ड्रेसकोड असावा, असा आग्रह त्यांनी धरला होता. त्यांनी केलेल्या कार्यवाहीचे सुरुवातीला कौतुक करण्यात आले होते. मात्र जिल्हा परिषद सदस्यांना कक्षाबाहेर थांबविणे, पदाधिकाऱ्यांचा मान सन्मान न ठेवणे, याबाबत थेट सर्वसाधारण सभेतूनच जिल्हा परिषद सदस्यांनी दीपककुमार मीना यांच्यावर टीका केली होती. काही वेळा बैठकांमधून थेट खातेप्रमुखांना अपमानास्पद वागणूक देणे, खातेप्रमुखांना स्वत:च त्यांच्या नस्त्या आणण्याचे आदेश व वेळेत नस्त्या न काढण्यासह आढावा बैठकांमधून वारंवार खातेप्रमुखांना निरुत्तर करणे, एकाच दिवसात अकरा अकरा परिपत्रके काढणे, यांसह अन्य बाबींमुळे दुखावलेले खातेप्रमुख मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांविरोधात विरोधात दुखावल्याची चर्चा होती. त्यातच दोन दिवसांपूर्वी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सर्वच खातेप्रमुखांची सेवापुस्तके त्यांच्या सरकारी निवासस्थानी नेल्याची चर्चा आहे. त्यामुळे आधीच दुखावलेले सर्व खातेप्रमुख एकत्र येऊन त्यांनी याबाबत थेट विभागीय आयुक्तांकडेच न्याय मागण्याची भूमिका घेतल्याचे कळते. या एकूणच घडामोडींबाबत खातेप्रमुख माध्यमांकडे अवाक्षरही बोलण्यास तयार नाहीत. काही प्रमुखांनी नाव न छापण्याच्या अटीवर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांविरोधात खातेप्रमुखांमध्ये असंतोष खदखदत असल्याची कबुली दिल्याने या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे.