शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

२३ लाखांचा मुद्देमाल जप्त : ट्रक चालकांना लुटणाऱ्या टोळीचा साथीदार गळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 20:43 IST

ग्रामिण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने मालेगावातून मुसक्या बांधल्या

ठळक मुद्दे१५ लाख रूपये किंमतीचे ४०९ कॉटनचे बंडल हस्तगत

नाशिक :महामार्गांवर ट्रकचालकांना अडवून लुटणा-या टोळीतील एका साथीदाराच्या ग्रामिण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या बांधल्या. त्याची कसून चौकशी केली असता तीन गुन्हे उघडकीस आले आहे. त्याचे इतर चार साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.गुजरातकडे जाणाºया नाशिक-पेठ महामार्गावर एका ट्रकचालकाचे वाहन (के.अ‍े५६-१९४५) गेल्या सोमवारी (दि.२०) बळजबरीने थांबवून ट्रकचालक अनिलकुमार बॅनर्जी (रा. जि. बिदर, कर्नाटक) यांना मारहाण करून टोळीने लेलॅन्डचा ट्रकसह कॉटनचा माल लुटला होता. या गुन्ह्यात तब्बल २६ लाख रूपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याची फिर्यादी दिंडोरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या गंभीर गुन्ह्याची पोलीस अधिक्षक डॉ.आरती सिंह यांनी गंभीर दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेला तातडीने तपास करून छडा लावण्याचे आदेश दिले. गुन्ह्याचे कुठलेही धागेदोरे हाती नसताना केवळ सीसीटीव्ही फुटेजच्या अधारे पोलीस निरिक्षक के.के.पाटील यांनी पोलीस निरिक्षक अनिल बोरसे, सहायक निरिक्षक संदीप दुनगहु, स्वप्नील राजपूत, उपनिरिक्षक कल्पेशकुमार चव्हाण, रामभाऊ मुंढे, दिपक अहिरे, अमोल घुगे, दत्तात्रय साबळे आदिंच्या पथकांनी तपासाला गती दिली. स्थानिक गुन्हे शाखेच्या एका पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्याअधारे मालेगावमधील देवीचा मळा भागात सापळा रचला. यावेळी संशयित अजहर वाजीद खान (३०,रा.देवीचा मळा) यास शिताफीने बेड्या ठोकल्या. त्याची कसून चौकशी केली असून या टोळीने गुन्ह्यात वापरलेली कार (एम.एच०३ बीई ०३८२) हस्तगत केली. तसेच गुन्ह्यात गायब केलेली ट्रक झोडगे शिवारातून जप्त केली. तसेच १५ लाख रूपये किंमतीचे ४०९ कॉटनचे बंडल असा एकूण २३ लाख रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. खान याचे फरार साथीदार यांचा पोलीस शोध घेत असून लवकरच त्यांनाही अटक करण्यास यश येईल, असे पाटील यांनी सांगितले. या टोळीकडून महामार्ग लुटीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :NashikनाशिकArrestअटकArti Singhआरती सिंगRobberyचोरीhighwayमहामार्ग