पंचवटी : परिसरातील दिंडोरीरोडवर तारवालानगर सिग्नल चौफुली मृत्यूचा सापळा बनली असून, तारवालानगरच्या सिग्नलवर अपघात ही नित्याचीच बाब झाली आहे. या चौकात क्रॉसिंगपुरता छोटा उड्डाणपूल उभारण्यात यावा जेणेकरून अपघातांची समस्या सुटेल. मनपा प्रशासनाने तत्काळ दखल घ्यावी, अशी मागणी महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे परिसरातील नागरिकांकाकडून करण्यात आली आहे.पंचवटी परिसरातील दिंडोरीरोडवर तारवालानगर सिग्नल चौफुली येथे अपघात नित्याची बाब झाली आहे. या अपघातांमध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला असून, काहींना तर कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे. या चौफुलीवर प्रवासी वाहनांचेदेखील अनेक वेळा अपघात झाले. राष्ट्रीय महामार्ग असल्याने या मार्गावर कायम वर्दळ असते. तसेच नव्याने विकसित झालेल्या कॉलनी परिसरामुळे या मार्गावर कायम राबता असतो. त्यामुळे या मार्गावर आत्तापर्यंत मोठे अपघात झालेले आहेत. त्यामुळे मनपा प्रशासनाने या चौकात क्र ॉसिंग पुरता छोटा उड्डाणपूल उभारावा, जेणेकरून अपघातांची समस्या सुटेल.
तारवालानगर चौफुलीवर अपघातांत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 00:49 IST