दिंडोरी : नाशिक कळवण रस्त्यावर अक्राळे त्रिफुलीवर स्कूटी व पिकअप मध्ये अपघात होऊन स्कूटीचालक महिला ठार झाली आहे.याबाबत दिंडोरी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की मोहाडी येथून लताबाई माणिक गांगुर्डे (४८, रा. कसबे वणी) या स्कूटीने (एम एच १५ जीएन २७७१) दिंडोरीकडे जात असताना अक्राळे त्रिफुलीवर पिकअप (एमएच १४, एझेड ३०३८) यांच्यात अपघात होऊन त्यात गांगुर्डे जबर जखमी झाल्या. त्यांना ग्रामस्थांनी तातडीने दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. दिंडोरी पोलिसांनी पिकअप चालक सुनील संपत पांडव यांच्याविरु द्ध अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार जाधव, जमादार दिलीप पगार हे करीत आहे.
अक्र ाळे त्रिफुलीवर अपघातात महिला ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 00:31 IST
दिंडोरी : नाशिक कळवण रस्त्यावर अक्राळे त्रिफुलीवर स्कूटी व पिकअप मध्ये अपघात होऊन स्कूटीचालक महिला ठार झाली आहे.
अक्र ाळे त्रिफुलीवर अपघातात महिला ठार
ठळक मुद्देगांगुर्डे जबर जखमी झाल्या.