शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

वेगवेगळ्या घटनांत सहा लोकांचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 01:00 IST

शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये सुमारे सहा लोकांचा अपघाती मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये एका ३६ वर्षीय युवकाचा इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली कोसळून तर एका वृद्धाचा पलंगावरून पडल्याने मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यांमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नाशिक : शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये सुमारे सहा लोकांचा अपघातीमृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये एका ३६ वर्षीय युवकाचा इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली कोसळून तर एका वृद्धाचा पलंगावरून पडल्याने मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यांमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पाथर्डी फाटा येथील दामोदरनगर येथील किरण देवरे (३६) हे इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली कोसळून मृत्युमुखी पडले. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस पुढील तपास करीत आहेत.झोपेत असताना पलंगावरून खाली पडल्याने ६४ वर्षीय वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना निलगिरी बाग परिसरात घडली. ब्रह्मदेव चिंधाजी सरदार असे या मयत वृद्धाचे नाव आहे. जेलरोड येथील एका बँकेसमोर झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेले रामकिसन नारायण कांगुणे (२४, रा. कॅनॉलरोड) या दुचाकीस्वार युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रामकिसन हा त्याच्या दुचाकीने (एमएच १५, जीके ३६६६) बिटको चौकाकडे जात असताना त्याचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरली. या अपघातात त्याच्या डोक्यास गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला.माडसांगवी येथील मानूर फाट्याजवळ एका पादचारी वृद्धाचा कारच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि.२८) सकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. जनार्दन बाळा शिंदे (६८) असे अपघातात ठार झालेल्या वृद्धाचे नाव आहे. देवळाली कॅम्प येथील वडनेर रोडलगत असलेल्या लोखंडी खांबावर जाऊन रिक्षा आदळून झालेल्या अपघातात सचिन हरिदास सानप (३२, रा. संसरी गाव) या रिक्षाचालकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि.२९) भाऊबीजेच्या दिवशी घडली.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू