शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
3
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
4
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
5
वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज; आ. गोपीचंद पडळकरांना केला फोन, म्हणाले...
6
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
7
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
8
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
9
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
10
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
11
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
12
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
13
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
14
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
15
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
16
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
17
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
18
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
19
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
20
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...

ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 16:14 IST

ट्रॉली उलटली : सुदैवाने जीवितहानी टळली

ठळक मुद्देगळीत हंगाम सुरू झाल्यावर अपघातांचे प्रमाण वाढून अनेकांना आपले जीव गमवावे लागले

पिंपळगाव बसवंत : ऊस वाहतूक करणारा डबल ट्रॉली असलेला ट्रॅक्टर पिंपळगाव बसवंत परिसरातील रानमळा येथे गुरुवारी (दि.१७) मध्यरात्री अपघात होऊन उलटला. सुदैवाने जीवितहानी टळली; मात्र बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा प्रश्न यानिमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाचे त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.गळीत हंगाम सुरू झाल्यावर अपघातांचे प्रमाण वाढून अनेकांना आपले जीव गमवावे लागले तरीदेखील बेकायदेशीर होणाऱ्या ऊस वाहतुकीकडे प्रशासनाकडून कानाडोळा केला जात आहे. ऊसाच्या वाहतुकीनुसार ट्रॅक्टरमालकाला कारखान्याकडून भाडे अदा करण्यात येते. यामुळे ट्रॅक्टरचालक ट्रॅक्टरच्या क्षमतेपेक्षा अधिक ऊस भरतात. यासाठी सर्रास दोन ट्रॉलींचा वापर करण्यात येतो. एका ट्रॉलीची क्षमता १४ते १५ टन इतकी असते; परंतु यामध्ये १८ ते २० टन ऊस भरण्यात येतो. नफा कमाविण्यासाठी बेकायदेशीरपणे अधिक ऊस भरला जातो. सर्रास विनापासिंग ट्रॉलींचा वापर करण्यात येतो व ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या अपघातास प्रामुख्याने ट्रॉली कारणीभूत ठरतात. त्यांना इंडिकेटरदेखील नसतो, शिवाय रिफ्लेक्टरदेखील वापरण्यात येत नाही. केवळ एका लाईटच्या जोरावर ट्रॅक्टरचालक बेफाम ट्रॅक्टर दामटत असतात. त्यातून अपघात घडून अनेकांचे बळी जातात. अशा वाहतुकीला अभय देऊन एकप्रकारे ग्रामीण भागातील रस्त्यावरील सुरक्षा वाऱ्यावर सोडत असल्याचे चित्र दिसत आहे.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघात